सुरण हा कंद पुष्कळ जण आहारात वापरतात व ब-याच जणांच्या हा आवडीचा कंद आहे.सुरणाची भाजी,सुरणाचे कटलेट,सुरणाचे काप अशा अनेक पद्धतीने आपण सुरण खाऊ शकतो.हा अगदी भला मोठा कंद असून ह्याचे दोन प्रकार असतात एक खाजरा व गोड.त्यातील गोड सुरण हा खायला उत्तम.
सुरणाचे झाड हे २-३ हात उंच असते व ह्याच्या कोवळ्या पानांची व मधल्या बुंध्याची भाजी करतात.तर सुरण हा जमिनीखाली उगवणारा वाटोळा असा तसेच बरेचदा आकाराने भला मोठा असा कंद असतो.ह्याला राक्षसी कंद म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
हा खरोखरच अत्यंत पौष्टिक असून चवीला हा तुरट,तिखट व उष्ण असून हा शरीरातील कफ व वात हे दोन्ही दोष कमी करतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत.
चला मग ते पहायचे ना आपण:
१)मुळव्याधी मध्ये सुरणाच्या कापट्या तुपात तळून खाव्यात.
२)संडासमधून आव पडत असल्यास सुरणाचा कांदा वाळवून त्याचे चुर्ण तुपात तळून खावे.
३)खोकला,पिवळाचिकटकफपडणे,बरगड्यांमध्ये वेदना होणे अशा तक्रारी मध्ये सुरण पाण्यात उकळून त्या पाण्यात मध घालावा व त्याचे चाटण करून वारंवार चाटून खावे.
४)तोंडास रूची नसल्यास सुरण उकडून त्यावर आल्याचा रस व काळेमीठ लावून खावे.
५)पुष्कळ जुन्या आजारातून बरे झाल्यावर आलेल्या अशक्तपणा मध्ये सुरणाची खीर करून खावी.
सुरण अतिप्रमाणात खाल्ल्यास भुक मंदावते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply