होय आपल्या आयुर्वेदानुसार हिलाच बावची अथवा बाकूची असे म्हटले जाते.आपण औषधी प्रयोगा करिता ह्याच्या बियांचे चुर्ण किंवा तैल वापरतो.पण आहारात मात्र ह्याच्या शेंगांची भाजी वापरली जाते.
अर्थात बोलीभाषेत हिलाच चिटकी देखील म्हणतात.आणि हिच एक अशी भाजी आहे जी कधीच चिरून केली जात नाही तर हिच्या शेंगा मोडून मग हिची भाजी करतात.कारण चिरताना जर ह्याच्या बिया कापल्या गेल्या तर हि भाजी कडू होते असे म्हणतात.
हिची भाजी कडवट असली तरी लागते छान आणि ब-याच लोकांना हि भाजी फारच आवडते.जशी हि स्वयंपाकात वापरतात तसेच हिचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
गोवारीची भाजी हि चवीला कडू तिखट लागते व हि उष्ण असते त्यामुळे ती शरीरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त मात्र वाढवते.
चला हिचे औषधी प्रयोग पाहूयात:
१) चाई पडून टक्कल पडले असल्यास गवारीच्या ह्यांचा लेप त्या जागी लावावा व पोटात खायला गोवार भाजी द्यावी.
२)हि भाजी कडूपौष्टीक मानली जाते त्यामुळे ताप येऊन गेल्या नंतर येणा-या अशक्तपणा मध्ये हि खायला द्यावी.
३)खरूज झाली असता गोवारीच्या बिया व कडूकारले गोमूत्रात वाटून लावावे.
४)त्वचेवर पांढरे कोड आल्यास तसेच सोरियासीस मध्ये गोवारीच्या बियांचे तेल त्वचेवर लावावे व पोटात खायला भाजी द्यावी.
५)मुळव्याध,कृमी व वारंवार संडास मधून आव पडणे ह्यात गोवारीची भाजी खाणे उत्तम होय.
गोवारीची भाजी खायचा अतिरेक केल्यास अॅसिडीटी,पातळ जुलाब होणे व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply