किती पाहुणे उडून येती,
या देशातून त्या देशात,
स्थलांतर त्यांचे असे पाहुनी,
चकित होतो आपण मनात,–!!
हजारोंची संख्या त्यांची,
एकरंगी नि एकढंगी,
सारखेच सगळे दिसती,
सारख्याच त्यांच्या ढबी,–!!!
आभाळातून उडताना,
बहुतेकांना ना थकवा,
हे पाहुणे असती वेगळे,–
वेळेवरती– आपुल्या गावा,–!!!
आगळेपण त्यांचे उठून दिसे,–!!!
किती पिढ्या गेल्या तरी,
हजारो वर्षे येती ते,
दरवर्षी परिपाठ असे,–
मार्ग त्यांना कसे सापडती,
कोण दिशादर्शक म्हणे,? –!!!
कोण त्यांना घड्याळ दाखवी,
नि कोण त्यांचे मार्गदर्शक,
ऋतू त्यांना कसे समजती,
कसे ठेवती दिवसांचा हिशोब,–?
सामान कुठले ना बरोबर,
ना कुठले साहित्य सवे, आत्मविश्वास केवळ घेऊन ,
प्रवास आपुला करती बरवे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply