वाचक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …..!
कोब्रा … एक अफलातून पुस्तक
लेखक – फ्रेडरिक फोरसीथ
त्या दिवशी डिनर पार्टीसाठी वॉशिंग्टन मधल्या ‘व्हाइट हाऊस’मध्ये वीस पाहुणे आले होते. प्रत्यक्ष अमेरिकेच्या अध्यक्षांनी आमंत्रित केलं असल्याने फ़र्स्ट लेडी यांनी स्व:ता त्यांच्याबरोबर फिरून व्हाइट हाऊस दाखवलं. त्यानंतर सगळे डिनर साठी टेबलवर बसले. व्हाइट हाऊसचा अनुभवी सेवकवर्ग … मोठया अदबीने सागल्याना ड्रिंक्स देऊ लागला …. अर्थातच सोबत थोडं खाणं …. वातावरणात एक वेगळीच अदब असली तरी सगळे मोकळेपणाने … आनंदात गप्पा मारत होते … त्याच वेळी काही पदार्थ पाहुण्यांना देताना … एका वृद्ध सेवक स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले …. ते बघून वातावरण थोडं विचित्र झालं …. हलका तणाव पसरला …. त्वरित दुसरया अनुभवी सेवकाने त्या वृद्धेकडून प्लेट काढून घेतली…. आणि ती वृद्ध सेवक बाजूला गेली …. वातावरण परत नॉर्मल झालं ….
इतकी वर्ष व्हाइट हाऊसमध्ये नोकरी करत असलेल्या त्या सेविकेकडून असं झालंच कसं …. तिला हे सगळे एटीकेट्स उत्तम माहीत होते …. फ़र्स्ट लेडी नक्कीच अस्वस्थ झाली ….. पार्टी संपल्यावर तिने त्या वृद्ध सेविकेला बोलावलं… सेविकेने नजर खाली झुकवत मॅडमची मनापासून माफी मागितली …दिलगिरी व्यक्त केली …. मग सांगायला सुरवात केली …… जेव्हा हे झालं त्याच्या दोन मिनिटं अगोदर तिला फोन आला होता …. तिचा एकुलता नातू मेल्याची बातमी होती …. तिला त्या नातवावाचून या जगात दुसरं कोणीच जवळचं नव्हतं …… तो नातू वॉशिंग्टन शहरातल्या … गरीब वस्तीतल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या पडीक बिल्डिंगमध्ये मृत झालेला पोलिसांना मिळाला होता ….. त्याला ड्रग्स … अंमली पदार्थ … कोकेन घ्यायचं (narcotics) व्यसन होतं … फ़र्स्ट लेडीने तिची समजूत काढली …. तिचं ते दुःख ऐकून घेतलं मात्र रात्री बिछान्यावर पड़ल्यावर तिने नवरयाला …. अमेरिकेच्या अध्यक्षाला ही गोष्ट सांगितली …. ती म्हणाली … तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष … म्हणजे जगातले सर्वोच्च्य समर्थ असलेले देशप्रमुख …. तुम्ही जगाचा नाश करणाऱ्या अंमली पदार्थावर नियंत्रण करू शकत नाही का? ही गोष्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना नक्कीच शोभत नाही ….. प्रेसिडेंट काही बोलत नाहीत … दुसरं काहीतरी बोलून तो विषय संपतों…. मध्यरात्र उलटून पहाटेचे दोन वाजलेले असतात….. अध्यक्षांना काही झोप येत नाही … त्या वृद्ध स्त्रीची गोष्ट ऐकून ते खूप अस्वस्थ झालेले असतात …. व्हाइट हाऊसमधलं प्रेसिडेंट यांचं ऑफिस चोवीस तास चालू असतं… ते आपल्या सेक्रेटरीला फोन लावलात … एका क्षणाचाही विलंब न होता सेक्रेटरी असलेली स्त्री फोन उचलते … येस मि. प्रेसिडेंट ….. प्रेसिडेंट तिला सांगतात की तुम्ही डीईएच्या (Drug Enforcement Administration) डायरेक्टरना मला जोडून द्या … त्यांच्या घरी किंवा ते जिथे कुठे असतील तिथे ….. त्या सेक्रेटरीला अजिबात आश्चर्य वाटत नाही …. जेव्हा तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष असता आणि त्याना अशा अपरात्री जरी मंगोलियाच्या प्रेसिडेंटशी बोलायचं असलं तरी सेक्रेटरीना ते काहीही करून करावंच लागतं …. ती सेक्रेटरी लगेच जॉर्जटाउन इथे राहात असलेल्या त्या डायरेक्टरला फोन लावते… दहाव्या रिंगला ते फोन उचलतात ……प्रेसिडेंटना तुमच्याशी बोलायचंय … एक क्षण प्लिज थांबा …. मी जोडून देते …. सॉरी …. तुम्हाला या अवेळी त्रास द्यायला लागतोय… प्रेसिडेंट बोलतात …. मला काही माहिती हवी आहे …. एखादे वेळेस सल्ला देखील … तुम्ही मला व्हाइट हाऊसमध्ये सकाळी नऊ वाजता भेटू शकाल का? ही खरी तर त्यांची कर्टसी असते …. त्या माणसाला देखील हे माहीत असतं …. अध्यक्ष सूचना….. हुकूम देतात ….. अर्थात तो डायरेक्टर ‘होय’ म्हणतो ….. प्रेसिडेंट फोन ठेवतात …. डायरेक्टर सारख्या सर्वोच्च अधिकारयाला नक्कीच जाणवतं….. प्रेसिडेंट एवढ्या अपरात्री जेव्हा फोन करून बोलवतात तेव्हा विषय नक्कीच गंभीर असणार ….. तो नंतर झोपत नाही ….. निघायच्या
तयारीला लागतो …..
‘कोब्रा’ पुस्तकाची गोष्ट अशी सुरू होते ….. आणि आपण पार गुंगून जातो …… प्रेसिडेंट त्या डायरेक्टरला सांगतात की मला कोकेन …. ड्रग ट्रॅफिकिंग बद्दल सगळी इत्यंभूत माहिती … डेटा हवा आहे …. तू दोन दिवसात काहीही करून दे …. प्रेसिडेंट …. पोलिस… सेनाप्रमुख यांना देखील बोलावतात … मोठी मीटिंग होते …. त्यात यासाठी खास वेगळा विभाग उघडायचं ठरतं ….विभागाचा प्रमुख म्हणून …. ‘सीआयए’चा निवृत्त … अत्यंत कर्तबगार धाडसी अधिकारी ‘डेव्हेरॉक्स’ याचं नाव सुचवलं जातं …. तो जेव्हा सीआयएमध्ये नोकरी करत असतो ….. तेव्हा त्याच्या भन्नाट कामगिऱ्या बघून त्याला सगळे जण ‘कोब्रा’ या नावाने ओळखत असतात ….. तो ही नेमणुक मान्य करतो ….. मात्र अनेक अटी तो प्रेसिडेंटना घालतों …. तो म्हणतो की मी सेनाप्रमुख …. सीआयए प्रमुख … पोलीस प्रमुख या कोणालाही रिपोर्ट करणार नाही …. फक्त तुम्हाला करेन ….. त्याचं बरोबरच असतं ….. कोकेनच्या व्यवहारात …. अनेक मोठे राजकीय नेते …. मंत्री … सरकारी अधिकारी …. बंदर अधिकारी … मोठमोठया जहाज कंपन्या कार्यरत असतात …. दक्षिण अमेरिकेतल्या ‘कोलंबिया’ सारख्या देशांतून हे कोकेन अमेरिकेत आणि जगभर जात असते … लाखो कोटींचा व्यवहार असतो …. प्रेसिडेंट त्याच्या सगळ्या अटी मान्य करतात ….. आणि हा कलंदर आपली ही भन्नाट मोहीम सुरू करतो … तो दोन बिलियन डॉलरचं सुरवातीचं बजेट मागतों … तो अत्याधुनिक जहाजं विकत घेतो …. त्यावर अत्यंत पावरफूल छोटी विमानं… सगळी अतिप्रगत साधनं …. अनेक हुशार तरुण भरती करतो…. आणि मग तो कोकेन तस्करांच्या मागे हात धुवून लागतो ….. आपण दक्षिण अमेरिकेपासून त्याच्या मागे मागे फिरत राहातों …. पार म्हणजे पार गुंतून जातो ….यात अनेक मोहिमा …. हल्ले …. शोधमोहिमा येत जातात …… हेरगिरी कमालीच्या उंचीवर जाते….. डेव्हेरॉक्स आपला सगळा अनुभव …. धाडस पणाला लावतो …. गुप्तपणे कोकेन घेऊन जाणारी कितीतरी जहाजं रहस्यमय रित्या समुद्रात बुडवतो …. एवढी प्रचंड मोठी व्यापारी जहाजं अचानक नाहीशी होतात…. तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही …. महा अफलातून गोष्ट आहे ….. जरूर वाचा ….. नंतर ही गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही ……
हे पुस्तक इंग्रजीतच आहे ….. माझ्या माहितीप्रमाणे मराठीत नाहीये ….. इंग्रजी अजिबात कठीण नाहीये …. पुस्तक बाजारात …. हुतात्मा चौकातल्या फुटपाथवर … सहज मिळतं …… अमेझॉन … बूकगंगा वर देखील उपलब्ध आहे …. मी अकरावीत असल्यापासून डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला लागलो … कॅप्टन दीप …. गोलंदाज … असे अनेक हिरो असत त्या पुस्तकातून …. वेड लागत असे ….. वाचनाचा तो जो नाद त्यावेळी लागला …. साधारण १९७८ पासून तो नंतर वाढतच गेला ….. मग ‘वाचन’ ही पहिली आवड झाली …. घरी शेकडो पुस्तकं घेतली गेली ….. ललित … कादंबऱ्या …. आत्मचरित्र … कथा … युद्धकथा ….कविता … किती किती विषय ….. आणि या पुस्तकांनी मग जगातल्या … मनाच्या …. निसर्गाच्या … कल्पनेपलिकडच्या गोष्टी सांगितल्या ….. आजही सांगत आहेत ….. मुख्य म्हणजे रोज ही पुस्तकं आपल्याला सांगतात …..ए पिटकरा ….. अरे बाबा …. तुला या जगातलं काहीच माहिती नाहीये …. तू अज्ञानी आहेस …. हे पहिलं लक्षात घे …. मान्य कर …. म्हणजे मग हे कळल्यावर तू नवीन गोष्टी मनापासून माहीत करून घेशील …… मी गेल्या चाळीसएक वर्षांच्यावर रोज किमान २५ पानं तरी वाचतोच ….. काहीही झालं तरी …. त्यामुळे आपल्याला या विराट सृष्टितलं काहीच माहित नाही … हे रोज जाणवतं …. आणि मग अतिशय नम्रतेने रोज शिपिशिपि … कणकण गोळा केले जातात …… इंग्रजी पुस्तकं अतिशय रंजक ….सुंदर असतात …. त्यातलं इंग्रजी फार कठीण नसतं …… थोड़ा ज़ोर लावला पाहिजे ….. सूरवातीला थोडं अस्वस्थ व्हायला होतं ….कारण आपण इंग्रजी पुस्तक वाचायचं, हे स्वीकारताच नाही …. पण जरा निग्रह ठेवला तर नंतर अफाट मजा येते …. आपण जर ही पुस्तकं वाचली नाहीत तर मोठया आनंदाला मुकु …इतकी ती छान आहेत …. असो … वाचक दिनाच्या परत एकदा शुभेच्छा …..जो वाचेल तो ‘वाचेल’ हे शब्द पूर्णार्थाने खरे आहेत, हे मात्र नक्की.
आज या प्रसंगी ‘आम्ही साहित्यिक’ या आपल्या ग्रुपविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो … या व्यासपीठावर… जिथे साठ हजार सदस्य आहेत ….तिथे मला लिहायला मिळतं …..विविध विषयावर लिहिलेलं वाचायला मिळतं…. खूप सुंदर असा सुसंवाद रोज अनुभवायला मिळतो ….रोज समृद्ध व्हायला होतं …
— © प्रकाश पिटकर
Leave a Reply