कसा ? व्यक्त करावा
कोलाहल मनभावनांचा
विषण्ण व्याकुळ उसासे
दृष्टांत ! सत्य जीवनाचा ।।१।।
मूक भोगणे मनगाभारी
वास्तव ! हेच जीवनाचे
श्रद्धा , अश्रद्धांचेच द्वंद
अकल्पी दृष्टांत जीवनाचा ।।२।।
सत्य ! असत्य ! संभ्रमी
उद्दिष्ट सारेच स्वस्वार्थी
जाहल्या बोथट संवेदना
निर्जीव अर्थ जीवनाचा ।।३।।
कुणीच कुणाचे नसते
ब्रह्माण्ड ! मृगजळ सारे
जगणेच केवळ फुकाचे
ध्यास उगा मना मुक्तीचा ।।४।।
कलियुगी सारा दिखावा
ऋणानुबंध ! सारे वोखटे
निर्झरी , शुष्क प्रीतभाव
साक्षात्कार हा जीवनाचा ।।५।।
प्रारब्धी हेच गूढ जीवनाचे
ऊनसाऊली सुखदु:खांची
जन्मा भोगूनी अंती मृत्यू
कां ? खेळ अनामिकाचा ।।६।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४३
१६ – ११ – २०२१.
Leave a Reply