नवीन लेखन...

कोलंबिया अवकाशयानाच्या अपघाताच्या निमित्ताने

फेब्रुवारी 2003 मध्ये झालेल्या कोलंबिया अवकाशयानाच्या दुर्दैवी अपघातानंतर अमेरिकेत वेगवेगळ्या चौकशी समित्या झाल्या. अपघातासंदर्भात प्रसिद्ध होणारी माहिती व अनेक तांत्रिक चुका विसंगतीसह वाचकांपर्यंत पोहचवली गेली. त्यासंदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या मराठी विज्ञान परिषद येथे झालेल्या भाषणाचा गोषवारा. 


3 फेब्रुवारी 2003 ला अमेरिकेतील नासा संस्थेने अवकाश मोहिमेवर पाठविलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा परतीच्या प्रवासात स्फोट झाला आणि मूळ भारतीय असलेल्या कल्पना चावलासह सात अंतराळवीर यात मृत्युमुखी पडले. कोलंबियाचा अपघात झाल्यावर इंटरनेटवर माहितीचा महापूर लोटला आहे. त्यातील माहितीत अनेक प्रकारची विधाने केलेली आहेत. इंटरनेटवर लिहिण्यासाठी लेखकांना माहिती पुरवली जाते आणि ते काहीही लिहितात. या लिखाणात अधिकृतता नसते. त्यामुळे या विधानांना पूरक किंवा छेदक असे काहीतरी सांगितले पाहिजे. कारण यानाचे वजन 10 टनांपासून 120 टनांपर्यंत होते आणि यानावर बाहेरून बसवलेल्या उष्णतारोधक लाद्या 20 हजारांपासून 35 हजारांपर्यंत होत्या; अशा तांत्रिक माहितीतही अनेक प्रकारच्या चुका मला आढळून आल्या.

यानाचा एकूण किती भाग उष्णतारोधक लाद्यांनी व्यापला आहे? काहींनी तो 100 टक्के व्यापला आहे असे म्हटले आहे. इंटरनेटवरून येणारी माहिती ही अशी फसवी आहे. कारण प्रत्यक्षात यानाचा फक्त 70 टक्के भागच उष्णतारोधक लाद्यांनी आच्छादलेला होता.

12 फेब्रुवारी 1981 रोजी कोलंबियाचे पहिले उड्डाण झाले. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे, या यानावर 34,000 लाद्या बसविलेल्या असून यानाचे वजन 96.2 टन होते. अवकाश यान आणि त्याचे उड्डाण हे फार जटिल आहे असे नेहमी म्हटले जाते. हे एवढे जटिल का मानले जाते याची माहिती अपघातानंतर आलेल्या एकाही लेखात आली नाही.

1958 साली अमेरिकेचा अंतराळ कार्यक्रम सुरू झाला. 15 मे, 1963 साली मर्क्युरी नावाचा कार्यक्रम सुरू झाला. सहा माणसांची उड्डाणे करून तो कार्यक्रम यशस्वी झाला. त्या वेळी हॅराल्ड मॅक्मिलन हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. ब्रिटनमध्ये तेव्हा सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. त्या वेळचे मॅक्मिलन यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, We never had it so good. don’t let labour ruin it!’ तो राजकारणी माणूस होता. माणसे अंतराळ मोहिमेवर गेली न की ते म्हणायचे, You know, this space thing is so complex – so awefully complex that I am surprised, how it ने works at all!’

जगातली दोन क्रमांकाची मोटर युरोपियन स्पेस कार्यक्रमाची आहे. त्यात 236 टन वजनाचे इंधन असते. म्हणजे अमेरिकेची मोटर 500 टन इंधनाची, युरोपची 236 आणि भारताची 140 टनाची अशी ती श्रेणी आहे. या सर्व मोटर्सचे वैशिष्ट्य असे की, त्या अनेक भागांत (सेगमेन्ट) बनवलेल्या असतात आणि एकावर एक रचलेल्या असतात.

एक राजकारणी म्हणून त्यांनी केलेले हे विधान सत्य आहेच; पण अवकाशयान हे जटिल वाटणारेच प्रकरण आहे. ही जटिलता कोणत्या स्तराची आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत.

भारताच्या भूस्थिर उपग्रहप्रक्षेपक वाहनात घन इंधन आहे. या भागात जी रॉकेट मोटर आहे, ती जगातील तिसरी मोठी रॉकेंट मोटर आहे. या मोटरचा व्यास 2.7 मीटर आहे. हा रॉकेटचा पहिला टप्पा आहे. जगातील सर्वांत मोठी रॉकेट मोटर अमेरिकन अवकाशयानाची आहे. तिच्यात 500 टन घन इंधन म्हणजे प्रॉपेलन्ट असते. प्रॉपेलन्ट हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे. कारण प्रॉपेलन्ट आणि फ्यूएलमध्ये फरक आहे. फ्यूएल जळायला बाहेरून ऑक्सिजन लागतो. रॉकेट अवकाशात जाते. तेथे त्याला ज्वलनासाठी ऑक्सिजन मिळत नाही; म्हणून त्याला ज्वलनासाठी लागणारा ऑक्सिजन इंधनात घातलेला असतो अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट असे ऑक्सिडन्टस त्यात घातलेले असतात. असे मिश्रण असलेले जे द्रव्य ते म्हणजे प्रॉपैलन्ट ते निर्वात परिस्थितीतही जळू शकते.

रॉकेटमध्ये इंधन हा फार महत्त्वाचा भाग असतो, कारण रॉकेटच्या एकूण वजनाच्या 80 टक्के भाग इंधनाचा असतो. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहनाच्या मोटरमध्ये 140 टन इंधन भरलेले आहे.

जगातली दोन क्रमांकाची मोटर युरोपियन स्पेस कार्यक्रमाची आहे. त्यात 236 टन वजनाचे इंधन असते. म्हणजे अमेरिकेची मोटर 500 टन इंधनाची, युरोपची 236 आणि भारताची 140 टनाची अशी ती श्रेणी आहे. या सर्व मोटर्सचे वैशिष्ट्य असे की, त्या अनेक भागांत (सेगमेन्ट) बनवलेल्या असतात आणि एकावर एक रचलेल्या असतात. एक भाग दुसऱ्याला टंग अँड ग्रूव्ह पद्धतीच्या सांध्याने जोडलेला असतो. भारताच्या मोटारीत 5 भाग आहे आणि ती 140 टन इंधनाची आहे. पाचाऐवजी दहा भाग केले तर आपल्याला 280 टन इंधनाची मोटर बनवता येईल.

ही मोटर जर प्रज्वलित करायची असेल तर ती काड्याच्या पेटीतील काडी पेटवून प्रज्वलित होणार नाही. म्हणजे यात वापरलेले प्रॉपलन्ट जरी स्फोटक आणि धोक्याचे असले तरी ते काड्याच्या पेटीतील काडीने पेटवून प्रज्वलित होणार नाही. मग मोटर प्रज्वलित कशी करायची? एका मोठ्या नळकांड्यामध्ये दुसरी एक रॉकेट मोटर बसवलेली असते. या दुसऱ्या रॉकेट मोटरचे वजन 14 किलोग्रॅम असते.

ही रॉकेट मोटर जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा एक प्रचंड जाळ निर्माण होतो. त्यातून निर्माण होणारा जो वायू असतो, त्यामुळे नळकांड्यात वायूचा/ हवेचा प्रचंड दाब निर्माण होतो आणि त्यामुळे मुख्य मोटर जळायला सुरुवात होते. (डॉ. अब्दुल कलाम यांचा शब्द आहे ‘इग्नाइट द माइंड्स’) ही 14 किलोग्रॅमची मोटरही प्रज्वलित करण्यासाठी तिच्या आत आणखी एक तिसरी मोटर असते. त्याच्या प्रॉपेलन्टचे वजन 1.5 किलोग्रॅम एवढे असते. (ही मोटर प्रज्वलित झाल्यावर ती 14 किलोग्रॅमची मोटर प्रज्वलित करणार आणि ती पुढे 140 टनाची मोटर प्रज्वलित करणार.)

आता ही 1.5 किलोग्रॅमची मोटर कोणी प्रज्वलित करायची? तर त्याच्याही आतमध्ये एक पायरोटेक्निक चार्ज असतो, म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि बोरोन पावडर यांचे ते मिश्रण असते. किती वजन असते त्याचे? त्याचे वजन फक्त 15 ग्रॅम असते म्हणजे 140 टनाची मोटर जर शेवटी प्रज्वलित करायची असेल, तर ती 15 ग्रॅम वजनाच्या चार्जवर अवलंबून असते. त्याला क्रिटिकल मास किंवा किमान वस्तुभार म्हणतात. जसे अणुभट्टीत फिशन प्रक्रिया चालू ठेवायला किमान वस्तुभार काढतात तसा येथे काढावा लागतो. हा जो किमान वस्तुभार आहे, तो समजा 15 ग्रॅमच्या ऐवजी 20 ग्रॅम केला तर तेथपासूनच स्फोटाला सुरुवात होईल. याउलट 15 ग्रॅम ऐवजी 10 ग्रॅम वस्तूभार केला तर मोटर प्रज्वलित होणारच नाही. या 15 ग्रॅमची पुड छोटीशी दिसली तरी तिच्यात प्रचंड शक्ती असते.

आम्ही प्रयोग करतानाची गोष्ट सांगतो. आमची पहिली मोटर फक्त 350 ग्रॅमची होती, 50 मिलिमीटर व्यास आणि अर्धा मीटर लांबीची. ती जर बरोबर पेटली नाही, तर प्रचंड स्फोट होत असे. लोखंडी सिलिण्डरचे तुकडे तुकडे होत असत. अशी ही जटिलता आहे. उलट मोजणी (काउण्ट डाउन) करताना 10, 9. वगैरे आणि ते 5 वर येते तेव्हा ती 140 टनाची मोटर प्रज्वलित होते व त्यात जाळ दिसायला लागतो. पण ती प्रज्तवीत होण्यापूर्वी आत काय घडत असते ते तुम्हाला दिसत नाही.

अवकाशयानाच्या बूस्टरमध्ये त्याच्यामुळे निर्माण होणारा दाब (थ्रस्ट) दोन हजार टनाचे धूड उचलतो. तो दाब 2 कोटी न्यूटन इतका असतो! याचा अर्थ 20 लाख किलोग्रॅमचा दाब तुम्हांला दुरून दिसते ती मोटर प्रज्वलित झालेली. मात्र त्याचा किमान वस्तुभार अत्यंत महत्त्वाचा असतो. तो 25 ग्रॅम करता येत नाही. आणि 10 ग्रॅमही करता येत नाही. तुम्ही पाहता तेव्हा ती तत्काळ प्रज्वलित झाल्यासारखी दिसते, पण ते तसे होत नाही. त्याला 300 मिलिसेकंद एवढा वेळ लागलेला असतो. त्याच्यापेक्षा तो कमी, जास्त करूनही चालत नाही.

हा फक्त एक भाग झाला. असे अनेक भाग आहेत. अंतरिक्ष यानातील जटिलता काय आहे याची आपल्याला यावरून कल्पना येईल. आपण वाचतो त्या माहितीमध्ये, लेखामध्ये ही जटिलता कोणी कधी सांगितलेली नसते. त्यांची माहिती वरवरची असते की, इतके सेकंद झाले. तितके झाले वगैरे वगैरे. माझ्या दृष्टीने ते फारसे महत्त्वाचे नाही. शेवटी महत्त्वाचे आहे ते मिशन हा सर्व खटाटोप कशासाठी आहे? हा सर्व खटाटोप 96.2 टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेण्यासाठी आहे.

कोलंबिया स्पेसशटलमधील घन इंधन असलेला बुस्टर, 5002न एका बाजूला आणि 500 टन दुसऱ्या बाजूला आहे. या दोन बुरमध्ये दहाण्ड्रोजन आणि ट्रेन ऑक्सिजन भरलेला असतो. याटाकोची क्षमता 20 लाख लिएर इतको असते यात सहा भाग ऑक्सिजन आणि एक भाग हायड्रोजन या प्रमाणात तो दव कोत भरतात. हायड्रोजन जळण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. म्हणून या टाकीत दोन कप्पे केलेले असतात. टाकीच्या खालच्या कण्यात ऑक्सिजन आणि वरच्या कण्यात हायड्रोजन असतो.

कोलंबिया अवकाशयान रॉकेटसारखे वर जात असे आणि विमानासारखे खाली येई टाकीवर सहा भाग जोडलेले असत. प्रत्येक दोन भाग निओपिन रबराच्या ओ-रिंगने जोडलेले असतात. हे निओपिन रबर एवढे दाट असते को तो रिंग धातूचीच बनवली आहे का, असे वाटते. तरीही त्याला संपीडकता (कॉम्प्रेसिबिलिटी) असते. वरचा भाग आणि खालचा भाग ओ-रिंगच्या सांध्याने जोडलेला असतो. हे दोन एवढे दाबून घट्ट बसवलेले असतात की, सांध्यातून कोणताही वायू बाहेर जाऊ शकत नाही.

28 जानेवारी 1986 रोजी झालेले उड्डाण असेच स्फोट होऊन जळून गेले होते. त्या उड्डाणाच्या बाबतीत असे झाले होते की, प्रत्यक्ष उड्डाणाच्या आधी 7-8 दिवस ते सर्व उड्डाण धक्क्यावर (लाँच पॅड) हवेत उघड्यावर राहिले होते. कोणाला कल्पना आली नाही. सर्व तपासण्या केल्या होत्या. अपघातानंतर नेमलेल्या तपास समितीने असा निष्कर्ष काढला की, यान 7-8 दिवस उघड्यावर राहिले होते. त्याच दिवसांत फ्लॉरिडामध्ये कधी नव्हे इतके वातावरणाचे कमी तापमान राहिलेले होते. हवा अतिशय गार झाली होती. त्यामुळे सांध्यातील ओ-रिंगची संपीडकता नाहीशी झाली आणि जेव्हा मोटर प्रज्वलित करण्यात आली तेव्हा त्यामुळे निर्माण झालेला वायू गरम होऊन सांध्यातून बाहेर पडला आणि पाठीमागच्या इन्शुलेटेड हायड्रोजन टाकीने पेट घेतला.

हे सर्व 90 सेकंदात घडले. हा अपघात असा घडला. अनपेक्षितपणे अकल्पितपणे गुणवत्तेच्या सर्व चाचण्या पार केल्यावरही. सर्व प्रकारची खबरदारी घेऊनसुद्धा रॉकेट बाहेर आले, मोटर बाहेर आली, शटल बाहेर आले आणि प्रचंड स्फोट होऊन हा अपघात झाला.

जेव्हा आपण अंतराळाचा विचार करतो म्हणजे आपण अंतराळ वाहनाचा विचार करतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी असे काहीतरी नवेनवे घडते आणि तो आपल्या शिक्षणाचा भाग ठरतो. नवीन ज्ञान मिळवण्याचा हा प्रकार आहे. हल्ली अमेरिकेतील अंतराळयान उड्डाणे ही अतिशय सुरक्षित समजली जातात. अपवाद म्हणजे हे दोन अपघात. 1958 साली जेव्हा नासाची स्थापना झाली तेव्हापासून त्यांचे कार्यक्रम अत्यंत सुरक्षित मानले जातात आणि अशा अवकाश वाहनाच्या उड्डाणात अपघात होण्याचे संभव हे विमान अपघातांपेक्षा कितीतरी कमी आहेत. विमानांचे अपघात अंतराळयानांपेक्षा हजार पटीने जास्त आहेत आणि तरीही विमान हे पूर्णपणे सुरक्षित असे आपण मानतो. कारण एखादे विमान अमुक एका वेळेला अमुक ठिकाणी जाईल तर त्याला अपघात होण्याचा संभव अत्यंत कमी आहे, म्हणूनच आपण हे अंदाज व्यक्त करतो.

विमानाच्या प्रवासाचा 100 वर्षांचा इतिहास आहे आणि तेवढ्या काळात त्याने सुरक्षित प्रवासासाठी नाव मिळवले आहे. अवकाशयान उड्डाणाला 40 वर्षेच होत आहेत. त्यांना वेगळ्या तऱ्हेची कामे करायची आहेत. पहिली 24 अवकाशयान उड्डाणे सुरक्षित झाल्यावर त्यात एकही अपघात झाला नसताना पंचविसाव्या उड्डाणाच्या वेळी 28 फेब्रुवारी, 1986 रोजी हायड्रोजन टाकीचा जागेवरच स्फोट झाल्याने अपघात झाला. नंतर परत 81 उड्डाणे झाली आणि आता 3 फेब्रुवारी, 2003 चा अपघात झाला, म्हणजे या उड्डाणांची विश्वसनीयता वाढत चालली आहे.

देशाच्या इतिहासात, जगाच्या इतिहासाच्या संदर्भात कल्पना चावलासारखी माणसे मरतात तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या धोक्याची कल्पना न असते. हीसुद्धा या प्रकल्पातील एक जटिलता आहे हे मला तुमच्या ध्यानात आणून द्यायचे आहे.

प्रत्येक देशाचे अंतराळविषयक कार्यक्रम असतात. त्यामध्ये एक प्रकारची साखळी असते. साधारणपणे 1969 साली पहिला मानव चंद्रावर उतरला आणि त्यानंतर दोन-अडीच वर्षांत सहा उड्डाणे झाली आणि त्यानंतर अमेरिकेने या कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली. यापूर्वी मर्क्युरी कार्यक्रम होता जेमिनी होता. जेमिनीमध्ये दोन अंतराळवीर जात असत.

जानेवारी 1972 साली प्रेसिडेन्ट निक्सननी जाहीर केले की, आता अमेरिका अवकाश कार्यक्रम सुरू करणार आहे. स्पेस शटलचा कार्यक्रम स्पेस ट्रॅन्सपोर्टेशन सिस्टीम किंवा स्पेस शटल हा सरळसरळ पृथ्वीपासून अंतराळात जायचे, परत यायचे असा कार्यक्रम होता. या सर्वांसाठी लागणाऱ्या सुविधा त्यांनी अगोदर निर्माण केल्या होत्या आणि म्हणून जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरला अंतराळाचे प्रवेशद्वार असे मानले गेले आहे. गेटवे टू स्पेस.

यानंतर जी उड्डाणे केली जाणार होती ती पूर्वीसारखी नव्हती. म्हणजे रॉकेट एकदा वर गेले की, त्यातले परत काही वापरता येत नसे कोलंबिया यानात सिलिण्डरच्या दोन बाजूस दोन सॉलिड बूस्टर्स असून त्यांमध्ये प्रत्येकी 500 टन प्रॉपेलन्ट (द्रव हायड्रोजन आणि द्रव ऑक्सिजन) होते. पण पूर्वीच्या तुलनेत कोलंबिया यानातील शेवटची इंधन टाकी सोडली, तर बाकीचे संबंध यान परत परत वापरता येई थोडक्यात या कार्यक्रमाप्रमाणे अवकाश प्रवास हा जणू विमानाने केल्यासारखा आहे. विमान जसे पुन्हा पुन्हा वरती जाते व पुन्हा खाली येते तसे हे आहे.

भारत सध्या एच. टी. पी. बी. हे इंधन वापरतो. इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे ठाण्याजवळील नोसिल कंपनीने हे इंधन 15-20 वर्षांपूर्वी बनवले. नंतर आणखीही इतर दोन-तीन कंपन्या हे बनवून देत. पूर्वी पी. बी. ए. प्रॉपैलन्ट वापरीत. नंतर अॅक्रिलिक नायट्राइड, अॅक्रिलिक अॅसिड आणि ब्यूटाडाईन या तीन एकवारीकांचा (मोनोमर) एच. टी. पी. बी. हा बहुवारीक (पॉलिमर) होता आणि एच. टी. पी. बी. हा प्रॉपेलन्ट वापरू लागलो; त्यानंतर गेल्या वर्षीपासून फ्रेंच लोक हा प्रॉपेलन्ट वापरू लागले. म्हणजे आपल्यानंतर 20 वर्षांनी.

एच. टी. पी. बी. तंत्रज्ञान हे व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे तंत्रज्ञान मानले जाते. ही माहिती कोणी कोणाला सहसा सांगत नाही. हे त्या त्या देशाचे एक सामर्थ्य मानले जाते. हे सामर्थ्य भारताला मिळवून देणारी माणसे येथल्याच शिक्षणपद्धतीत तयार झालेली आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीवर आण जरूर टीका करावी, तरी याच माणसांनी हे गुप्त तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे इंधन आपण जगात प्रथम वापरले.

एरियन-5 हे काय आहे? युरोपातील कोणत्याही एका देशाला अवकाशासंबंधीचा खर्चिक कार्यक्रम एकट्याने राबवणे शक्य नव्हते म्हणून युरोपमधील सर्व राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला.

जगातला या संबंधातला, म्हणजे वजन (पे लोड) अंतराळामध्ये सोडायचा व्यापार प्रचंड आहे. काही कोटी अब्ज डॉलरचा (मल्टि बिलियन डॉलरचा); आणि त्यातील 60 टक्के व्यापार एरियन करतात. पण एरियनची पद्धत अशी आहे की, एकदा उड्डाण झाले की त्यातला कोणताही भाग पुन्हा वापरता येत नाही. याउलट कोलंबियामधील 70 टक्के भाग परत परत वापरता येणारा होता. आज अंतराळात एक किलो वजन न्यायला 30,000 डॉलर खर्च येतो तर 2 लाख किलोग्रॅमचे वजन वर न्यायला किती खर्च येईल याची तुम्ही नुसती कल्पना करा (600 कोटी डॉलर अथवा 30,000 कोटी रुपये).

अवकाशात न्यायचे वजन (पे लोड) अवकाशयानाचे एकूण वजन

हा आकडा आपण पाहिला तर अमेरिकेमध्ये 4.5% आहे आणि बाकीच्या जगात 1.0 ते 1.5% एवढेच वजन (पे लोड) ते नेऊ शकतात. एकदा वापरून फेकून द्यायच्या अवकाशयानाला त्यामुळे खूप महत्त्व आहे.

500 टन प्रॉपैलन्ट दोन मिनीट आणि 2 सेकंदात जाळून टाकायचा असतो. समजा त्याला 3 सेकंद जास्त लागले म्हणजे 2 मिनिटे 5 सेकंद लागले तर प्रॉपेलन्ट जळत असतानाच ते बाजूला होईल. म्हणून प्रॉपलन्ट 2 मिनिटे 2 सेकंदांतच जळले पाहिजे. एक सेकंद जरी जास्त झाली तरी मोहीम अयशस्वी होते.

समजा 2 मिनिटे दोन सेकंदांऐवजी 2 मिनिटे 2 संकंद कमी असतानाच ते जळाले तर राहिलेले चार सेकंद ते ओझे (डेड वेट) म्हणून राहील. तेही परवडण्यासारखे नाही. तर ही जटिलता अशा प्रकारची आहे.

कोलंबियातील द्रव इंधनाची टाकी चार मिनिटांनी बाजूला होते आणि ती अशा तऱ्हेने बाजूला होते की, तोपर्यंत शटल पुढे गेलेले असते. म्हणजे ती स्वतंत्रपणे पडते आणि पडता पडता जळून जाते.

कोलंबिया यानात एक कार्गो बे ऊर्फ सामान कक्ष होता. यातून तुम्हांला खालचे पृथ्वीवरचे काही निरीक्षण करायचे असेल, तर ते करता येईल अशी त्याची स्थिती बदलता येई. म्हणजे आकाशातील काही बघायचे असेल तेव्हा खिडकीची जागा बदलली की झाले. यानाचा आस वा कणा हा जेव्हा पृथ्वीला काटकोनात असतो तेव्हा कमीतकमी इंधन खर्च होते. या वेळेला यानाचा वेग प्रति तास 28.800 कि.मी. असतो व त्या वेगाने ते पृथ्वीवर यायचा प्रयत्न करते. याच वेगाने फेऱ्या घालून निरीक्षणे केल्यावर त्याला पृथ्वीवर उतरायचे असेल त्या वेळी यानाचा एक भाग वर उचलला जातो.

यानाच्या खालच्या बाजूला, पुढच्या भागाला उष्णतारोधक लाद्या (टाइल्स) लावलेल्या असतात. प्रति तास 28,800 कि.मी. वेगाने यान चाललेले असताना ते जेव्हा वातावरणात प्रवेश करते तेव्हा वातावरणातील एखादा बारीक कण अथवा खिळा यानावर येऊन आदळला तरी यानाला इजा होईल. कारण यानाचे वजन गुणिले यानाचा वेग यांचा गुणाकार, म्हणजे मोमेंटम प्रचंड असेल.

कोलंबिया यान पृथ्वीवर उतरायच्या तयारीत असताना 16 मिनिटे अगोदर तापमानदर्शकाने तापमान एकदम वाढलेले दाखवले आणि यानातील विशिष्ट दाबाखाली असणाऱ्या भागातील दाब कमी होत चालल्याचे दिसले. नेहमीच्या परिस्थितीत अर्से होते की, या वेळी विशिष्ट उंचीवर हवेचे विदलन (आयोनायझेशन) होते आणि साधारणपणे दहा मिनिटांचा काळ असा असतो की, या हवेच्या विदलनामुळे संपर्क तुटतो. रेडिओ लहरी या वातावरणातून जाऊ शकत नाहीत आणि नंतर दहा मिनिटांनी परत संपर्क सुरू होतो. याच वेळी कोलंबियातील दाब कमी होत चालल्याचे लक्षात आले. सामान कक्षात दोन कप्पे असतात. वरच्या कण्यात कमाण्डर आणि पायलट व त्यांचे दोन सहकारी बसतात आणि खालच्या कप्यात प्रयोग करणारे राहिलेले तिघे बसतात. हे भाग अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून सांभाळायला हवे. यान उतरताना ठरावीक कोन करून ते उतरते. त्या उतरण्याच्या क्रियेत उष्णता वाढली व अपघात घडला असावा पृथ्वीवर उतरण्याअगोदरच त्याचा लॅण्डिंग गियर बाहेर आला, विमानाची चाके जशी बाहेर येतात तसे हे लॅण्डिंग गियर तेथे कोठेतरी हवा आत गेली असावी, त्यामुळे त्याचे तुकडे झाले. असे चार तुकडे नंतर सापडले.

अवकाश मोहिमेचा हा सर्व खटाटोप कशाला चालू आहे? अंतराळात एक धक्का (प्लॅटफॉर्म) निर्माण करायचा आहे. दरवेळी 2000 टनाचे वजन वर न्यायचे, ते फक्त 96.2 टन पेलोडकरिता. त्याऐवजी अंतराळातच जर धक्का केला तर तेथपासून याने पाठविता येतील. त्या ठिकाणी वजनरहित स्थिती असते. त्यामुळे अगदी 5-10 टनाच्या उपग्रहालाही तुम्ही नुसता धक्का दिलात, तरी ते पुढे जाईल. या धक्क्यावरून चंद्रावर वा इतर ठिकाणी यान पाठवता येईल. असा या धक्क्याचा फायदा होणार आहे.

धक्का बांधण्याच्या या कार्यक्रमाला युरेका असे नाव आहे. या युरेकाचे शटल 400 कि. मी. च्या कक्षेत जाण्याऐवजी 400 ते 450 कि.मी. च्या कक्षेत गेले तेव्हा यांत्रिक हाताचा वापर करून त्याला योग्य कक्षेत खेचून आणले. उपग्रह दुरुस्त करण्यासाठी ते परत आणण्यासाठी अवकाशकेंद्र बनत आहे. एका वेळी 29.54 टन वजन (पे लोड) नेण्यासाठी आणि त्यातील 14 टन परत आणण्यासाठी. युरेकात काही अडचण झाली तर यांत्रिक हात वापरून ते सबंध खाली आणता येईल. हा त्यांचा एक अत्यंत यशस्वी प्रकल्प आहे.

मुळात ही कल्पना 1995 सालची आहे. युरेका केंद्र आता 50% पुरे झाले आहे. एकूण 45 उड्डाणांत ते पूर्ण करायचा प्रकल्प आहे. हे केंद्र एवढे मोठे आहे की, त्यातून ३ बसेस आरामात फिरतील. तेथे एक स्पेस फॅक्टरीही करायची आहे.

अमेरिकेतील टिटो नावाचा कोट्यधीश सात दिवसांची अंतराळ सहल करून परत आला. मानवी इतिहासातील हे मोठे पाऊल आहे.

कोलंबिया अपघातासाठी चौकशी समित्या नेमल्या आहेत. त्यांचे अहवाल यथावकाश येतीलच.

— डॉ. वसंत गोवारीकर 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..