साहित्य : १ किलो चांगले मटण, मध्यम बारिक तुकडे करुन ठेवणे, आलं लसूण पेस्ट वाटून लावणे, थोडं मीठ व दहि एकत्र करुन ते मटणास लाऊन ते ४ तास ठेवणे.
मसाला : २ कांदे कापून ठेवणे, पाऊण कप सुके खोबरे, तीळ, खखस, जिरे १ टेबल स्पून, धणे १ टेबल स्पून, १ चमचा बडिशेप, ५-६ लवंगा, ८-१० लाल सुक्या मिरच्या (बिया काढून), २ तुकडे दालचिनी, २ मसाला वेलची, थोडे जायफळ
कृती : कांदे तेलात परतून काढून घ्या – इतर साहित्य मंद गॅसवर परता., सर्व मिश्रण बारिक वाटून घ्या, पुन्हा तेल गरम करुन त्यात ३ कांदे बारिक चिरुन घाला, मुरवलेले मटण घाला व खूप परता. वाटलेला मसाला घाला व परता. २ कप गरम पाणी घाला व मटण एकदम नरम शिजू द्या. आणि मीठ चवीनुसार घाला.
— सौ. निलिमा प्रधान
Leave a Reply