कोण दिसे हा पाण्यामध्ये,असावा माझाच भाईबंद,
चोच बांकदार, रूप देखणे,
मनाने दिसतोय स्वच्छंद,
गुबगुबीत पांढरी पाठ,
कोरीव वर काळ्या रेघा,
नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका ,
सुळकन जो वर येईल,
मटकावेन आधी त्याला,–!!!
कळणारही नाही याला,
कधी गिळले मी माशाला,-?
डोळे तीक्ष्णमाझे,
नजरही अगदी करडी,
पाण्यातील या पक्ष्याची,
मात्र भासे मज बेगडी,–!!!!
हिमगौरी कर्वे.
Leave a Reply