नवीन लेखन...

कोण जिंकले?

मी सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो व पदपथावरून चालत होतो. समोर एकजण दोन हातात दोन कुत्र्यांचे पट्टे धरून चालला होता. यातील एक कुत्रा, आपल्याला ज्या कारणासाठी बाहेर आणले गेले आहे त्याची पुरेपूर जाण ठेवून होता. फुटपाथवरील झाडे, खांब, पार्क केलेल्या गाड्या यांचा मागोवा घेत होता. दुसरा डुलत डुलत चालला होता. कुत्र्यांचा मालक खांदा व मान यामधे मोबाईल ठेवून बोलत होता. अचानक त्या मालकाच्या हाताला हिसके बसू लागले. तो गोंधळून गेला. फोन महत्वाचा असल्याने तो सावरण्याची कसरत त्याला करावी लागत होती. जो खांदा मोबाईल धरण्यात गुंतला होता, तोच हात खेचला जात होता. त्या हद्दीतील कुत्रा सहकार्‍यांना वर्दी देत होता, ‘घुसखोर आले आहेत’. दोन्ही बाजूंकडून भुंकण्याचा दणदणाट झाला. त्या गदारोळात मालकाने कसरत करत संभाषण सुरू ठेवले होते.

माझ्यापुढे मालक व दोन कुत्रे यांची वरात चालली होती. काही अंतरावर पुन्हा हिसका बसला पट्ट्याला. यावेळी फारच तीव्र ओढ जाणवत असावी. मालक हेलपाटला. फोन पडू न देता तो सावरला. कोणतेही कुत्रे भुंकत नव्हते. त्याने आसपास नजर टाकली. पलीकडल्या फुटपाथवरून एकजण श्वानासह भ्रमंतीला निघाला होता. जोरदार हिसका का बसतो आहे हे मालकाच्या ध्यानी येत नव्हते. ऐलतीरावरील व पैलतीरावरील कुत्र्यांची ‘पुच्छपल्लवी’ चालली होती. आता पुढे सरकणे त्या मालकाला शक्य होत नव्हते. दोन्ही हात गुंतल्याने फोन खिशात ठेवता येत नव्हता. मान वाकडी करूनच काय ते करावे लागत होते. कुत्र्याची ताकद मालकाला भारी पडत होती. शिकविलेल्या कोणत्याही सूचना पाळण्याची त्या कुत्र्याची इच्छा नव्हती. ओढाताण सुरु होती. फिरायला जाणारे एकमेकांना अभिवादन करतात तसे पाळीव कुत्रेही एकमेकांची दखल घेतात हे मालकाच्या लक्षात आले. तसाच प्रकार असावा असे समजून तो पुढे जाऊ लागला. पण आज हा प्राणी ऐकत नव्हता. पलीकडून चाललेल्या श्वानाचा मालक असेच अनुभवत होता. तो रस्ता क्रॉस करून ऐलतीरी आला. दोन मालकांनी एकमेकांना नजरेने ओळख दाखविली. त्याचवेळी दोन्ही कुत्र्यांनीही संवाद साधला. पट्ट्याला बसणारे हिसके कमी झाले. दोनेक मिनिटात, मालक आपापल्या दिशेने जावू लागले. दंगा आणि ओढाताण करणारा तो कुत्रा आता शांतपणे चालला होता. दोन कुत्र्यांच्या त्या मालकाने आपल्या प्रेयसीसाठी बगलेत ‘बुके’ घेतला होता. तो फोनवर बोलला, ‘Happy Valentine Day’. दोन हातात पट्टे, सावरणारे दोन पाय, खांदा-मान यांच्या बेचक्यात फोन, बगलेत बुके, नजरेने हॅलो व प्रेयसीशी हितगूज करणारा तो मालक खरंच ‘अष्टावधानी’ होता.

शांतपणे चालणारा कुत्रा बहुधा हसत असावा. मनातल्या मनात म्हणत असावा – ‘’Valentine Day ला आपण बाजी मारली. समोरून जाणार्‍या आपल्या ‘श्वान मैत्रीणीला’ आपण आधी भेटलो. अब मालिक जाने और उसकी Girl Friend जाने. मालक ‘अष्टावधानी’ तर मी ‘प्रसंगावधानी’.’’

— रविंद्रनाथ गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

3 Comments on कोण जिंकले?

  1. खूप छान लिहिलयस,असाच लिहीत जा, आणि आम्हास वाचायला देत जा..आणि सर्व लेखाचे एकत्रीत पुस्तक स्वरूपात प्रकाशित कर..
    …आनंद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..