नवीन लेखन...

कोण सांगे काय करावे (सुमंत उवाच – ४५)

कोण सांगे काय करावे
कोणा संगे कुठे जावे
काम स्वतःस सांगावे
इतरांसाठी

नुसत्या न माराव्या चकरा
मागे मागे मिळती भाकरा
हात दिले ते वापरा
न पसरण्यासाठी

अर्थ-

मी साहेबां बरोबर असतो, मला त्यांच्या इथे मान आहे. मला कोणताही काम करायचं असल्यास परवानगी लागत नाही. ही सगळी ऐट घरी, आजूबाजूच्या परिसरात दाखवायला खूप कामास येते. पण प्रत्यक्षात मात्र सांगकाम्या हे नाम त्या कार्यकर्त्याला पूरक ठरते. असेच नेताभक्त गल्लोगल्ली, शहरोशहरी, गावोगावी हजाराच्या संख्येत पाहायला मिळतात. आशा लोकांना स्वतः काय करावे हे कधीच कळत नाही कारण त्यांचं आयुष्य केवळ हाजी हाजी करण्यात जातं. आणि एक क्षण असा येतो जेव्हा आपली किंमत आपण ज्याच्यासाठी इतकी वर्षे झटलो, काम केलं ज्याच्या निवडून येण्यासाठी जीवाचं रान केलं त्या माणसाला नाही हे समजते आणि मग इतकी वर्षे केलेल्या लांगूलचालनाची किंमय शून्य ठरते तेव्हा तो व्यक्ती कोलमडतो आणि आधी पासूनच व्यसनाधीन असल्या कारणाने त्यातच स्वतःच आयुष्य खर्ची करतो.

पण, जिथे देशभक्ती मनात, तनात, घरात आणि विचारात ठासून भरलेली असते तिथेले चित्र मात्र खुप निराळे असते. एकतर कोणत्याही प्रकारची चमचेगिरी नाही, भाकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड नाही तर केवळ देशासाठी केलेले योगदान हे महत्वाचे ठरते. अतिशय बोलकं उदाहरण माझ्याच शहरातलं, सध्या कोरोना आजार पसरतोय, जीवितहानी होत्ये, गांभीर्य आता लक्षात येतंय आपल्या. पण अजून त्याची चाचणी काही मोठ्या पातळीवर आणि जिथे जास्त गरज आहे त्या भागांमध्ये (झोपडपट्टी भाग) होताना दिसत नाही. शहरातले आमदार घरोघरी धान्यवाटप करतायत. जे मतदार साधन आहेत तेही ते लुबाडल्या सारखे घेतायत. पण कोणताही राजकीय पक्ष PP किट घालून अति संवेदनशील भागात जाऊन तिथल्या लोकांची विचारपूस करायला धजावत नाहीये. कारण त्यांचे कार्यकर्ते त्या लायकीचेच नाहीत मुळात. घाबरतात असे सांगितले जाते पण, या सगळ्यात एक विचारधारा अशी आहे जी कुठेही, कधीही आणि कोणत्याही रिस्क वर जाऊन काम करायला तयार आहे आणि करत्ये. कारण त्यांच्या मनात देशभक्ती ठासून भरल्ये. तिथे भाकरीची आणि मानाची अपेक्षा ठेऊन काम केले जात नाही. त्या विचारधारेचे नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( R.S.S ).

— सुमंत परचुरे

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..