कोण सांगे वेळ कुठली
कोणा वाचूनी काय अडले
परी साथ मिळता जगाची
अशक्य असे स्वराज्य घडले!!
अर्थ–
काही नवीन करायचे आहे, काही जुने नव्याने करायचे आहे, काही विचार प्रत्यक्षात आणायचे आहेत. पण मुहूर्त मिळत नाही. एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी नक्की कोणती वेळ निवडावी? बरं यात कोण साथीस आहे? या पेक्षा आपण कोणाच्या साथीत होतो हे कळणे जास्त गरजेचे आहे. काळ हा घड्याळ काढून ठेवले तरी चालतच असतो आणि तो पडद्याआड गेलेल्या गोष्टी विसरत नाही त्यामुळे काळानुसार फळ हे मिळतेच. पण मग ते फळ चांगले मिळण्याची अपेक्षा ठेवायची असेल तर आपण चांगलं वागतो का याचा विचार करायला पाहिजे.
आपलं कौतुक होणं अपेक्षित असेल तर आपण कोणास हाडतुड तर करत नाही ना? हे पाहणे गरजेचे. आपलं वागणं चांगलं असलं तर साथ ही आपोआप मिळत जाते. हुकूमशाही सुद्धा योग्य रीतीने कशी करावी याच उत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्य!! पण ते करताना कोणास उच्च तर नीच ठरवले गेले नाही हे ज्याला कळले त्याच्या हातूनच स्वराज्य घडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नाहीतर हे सिंहासन माझं म्हणता म्हणता ते लाथेने उडायला वेळ लागत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply