मला ओळ्खल्याचा दावा
तिनेही नाही केला
जिच्या मी प्रेमात पडलो…
माझे डोळे तिलाही
नाही वाचता आले
जिच्या प्रेमात मी रडलो…
माझ्या हृदयातील धकधक
मी कधीच नाही
तिला ऐकवत हसलो…
जगासाठी जगता जगता
मी केव्हातरी तिच्यासाठी
स्वार्थाने जगायला शिकलो…
दुरूनच तिचा आंनद
पाहून आंनदी होत
आनंदाने जगत राहिलो…
एकाकी काल्पनिक त्या
क्षितिजावर तिची वाट पाहात
प्रेमवेड्यासारखा मी बसलो…
ज्ञान प्राप्त होताच
अलौकिक या विश्वाचे
तिच्यासह स्वतः ला भूललो…
कोण तू ? आता मी
ती समोरी येता प्रेमाने
तिलाच विचारू लागलो
© कवी -निलेश बामणे
Leave a Reply