कधी तू ‘शिक्षक ‘असतेस ,
तर कधी तू ‘शिक्षा ‘ असतेस !
कधी तू खूप ‘दूरची’ भासतेस,
तर कधी तू ‘जवळची’ असतेस!
बरेचदा तू ‘आई ‘असतेस,
पण प्रसंगी तू ‘बाप’ होतेस !
कधी तू ‘असतानाही’ नसतेस,
तर कधी ‘नसतानाही’ असतेस !
मला हवी तशी ‘तू’ कधीच नसतेस,
म्हणून मग तू फक्त ‘बायको’ होऊन रहातेस !
कधी कळेल तुला, कोणास ठाऊक ?
मला तू ‘मैत्रीण’ म्हणून हवी असतेस !
— सुरेश कुलकर्णी