आपल्या संस्कृतीत एक मोठा गैरसमज आहे की पॅशन हे (Spontaneeu) च बसतं तुम्हाला तुमचं काम आवडतं किंवा आवडत नाही. तुम्हाला व्यायाम करायला आवडतो किंवा आवडत नाही. तुम्हाला पुस्तकं वाचणं आवडत किंवा कंटाळवाणं वाटतं. पॅशन ही गोष्ट निर्माण केली जाऊ शकत नाही.
पॅशन हे निर्माण केलं जाऊ शकतं फक्त गरज आहे ती संयमाची आणि मनाची कवाडं उघडी करण्याची. याचा फायदा असा की ज्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात त्या तुम्हाला काही कालांतराने आवडू लागतात. व्यायाम, शिक्षण, अभ्यास, काम आणि अगदी कुठलीही गोष्ट तुमच्या पॅशनमध्ये परिवर्तीत करता येऊ शकते. हे कौशल्य आपण आत्मसात करणं म्हणजे आपलं आयुष्य आनंदाने भरून टाकण्याची गुरू किल्ली आहे. त्यासाठी खालील काही मार्गाचा अवलंब आपण करू शकतो.
१ उत्सुकता आणाः उत्सुकता हे पॅशनचं मूळ आहे. ज्या विषयात तुम्हाला उत्साह (Passikon) निर्माण करायचा आहे त्याबद्दलचे जे विचार आहेत ते झटकून टाका आणि एका अज्ञानी दृष्टीकोनातून त्या विषयाकडे पाहा. त्यानंतर त्यातील नाविन्य शोधा जो तुमची त्या विषयाबद्दलची आवड निर्माण करेल.
२ खेळाचं स्वरूप द्या : नियम बनवा, उद्दिष्ट निश्चित करा. जितकी कल्पकतेची गरज जास्त तितके चांगलं.
३ ध्येय निश्चित करा : कालमर्यादेसहित स्पष्ट ध्येयाची आखणी करा. त्याने तुम्हाला एकदिशा व हेतू मिळेल. तुम्हाला तुमचं प्रत्येक काम हे एक कल्पकतापूर्ण आव्हान वाटू लागेल.
४ स्वतःला व्यक्त करा : स्वतःला व्यक्त करण्यासाठी संधी शोधा. तुमच्या कामात नाविण्य आणण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कामातून तुमचं वेगळेपण दाखवा.
५ फोकस : जितका फोकस एकाग्रता जास्त, तितक्या सहज तुम्ही त्या गोष्टीत आवड निर्माण करू शकता.
६ जिगसॉ : जिगसॉ म्हणजे एखादया चित्राचे वेगळे केलेले अनेक तुकडे एकत्र करून ते चित्र परत बनवण्याचा एकखेळ. तुमच्या कामातील छोटया छोटया गोष्टींकडे एका मोठया सुंदर चित्राचे तुकडे म्हणूनच पाहून तुम्हाला एकत्र जोडायचे आहेत.
७ प्रवासाचा आनंद घ्या : ध्येय निश्चित केल्यावर त्याकडे होणाऱ्या प्रवासाचा आनंद घ्या. ध्येयपूर्ततेच्या सततच्या विचारांमुळे, काळजीमुळे तमचा त्या विषयातील उत्साह कमी होऊ लागतो.
८ कौशल्याची जोड द्या : तुम्ही आधीच आत्मसात केलेल्या कौशल्याचा वापर करण्याचे मार्ग शोधा. एक कलाकार अभ्यासासाठी त्याच्या चित्रकलेच्या कौशल्याचा वापर करू शकतो.
९ निराशेवर मात करा : एखादी गोष्ट जर खुपच कठीण असेल तर परिणामाविषयीची चिंता कमी करा आणि प्रयोगशील राहा जोपर्यंत तुम्ही ती कौशल्यं आत्मसात करत नाही. प्रयत्नशील राहा.
१० उर्मी मिळवा : उर्जा ही सांसर्गिक असते. अशा लोकांचा शोध घ्या ज्याच्याकडे तुम्हाला हवी असलेली उर्जा आहे आणि त्यांच्या मधील उर्जेचे स्त्रोत जाणून घ्या. त्यातून कदाचित तुम्हाला अशी काही माहीती मिळू शकेल कि ज्याबद्दल तुम्हाला कल्पनाही नव्हती.
११ साखळी तोडा : जबरदस्तीने एखादं काम करणं हा तुमच्या पॅशनला संपवण्याचा एक खात्रीलायक मार्ग आहे. स्वतःला कामामध्ये झोकून देण्याऐवजी तुम्ही त्याला विरोध करता. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही असे समजून तुम्ही काम करता पण तसे नाहीए. तुमच्याकडे नेहमी पर्याय असतात.
१२ आव्हानांचं ट्यूनिंग करा : कंटाळवाणी कामं कठीण करा, निराश करणाऱ्या गोष्टी सोप्या करा. त्यासाठी त्यांच्या पूर्ततेच्या गतीत किंवा वेळ मर्यादेत कमी-जास्त बदल करा. कंटाळवाणी कामं पूर्ण करण्याचा वेग वाढवा. निराश करणाऱ्या गोष्टींत परफेक्शन ऐवजी प्रयोगशीलतेवर लक्ष केंद्रित करा.
१३ सूचना किंवा सल्ला घ्या : एखादी अशी व्यक्ती शोधा जी तुम्हाला त्या विषयावरची मूलभुत माहीती देऊ शकते. मूलभुत गोष्टीही माहीत नसणं ही देखील पॅशनला मारक गोष्ट आहे.
१४ सार्थ अभिमान : पॅशनसाठी अभिमान आवश्यक आहे, पण अहंकार मात्र त्याला मारक आहे. नवीन गोष्टी हाळताना स्वतःच्या योग्यतेबद्दल विश्वास असावा, पण त्या नवीन गोष्टीचा आदरही ठेवला गेला पाहीजे.
१५ तातडीच्या गोष्टींवर फोकस करा : अगदी पुढच्या गोष्टींवर लक्ष द्या. पुढच्या महिन्यात किंवा पुढच्यावर्षी काय करायचे याबद्दल फार विचार करू नका. जर त्या गोष्टी तुम्हाला भांबावून टाकत असतील.
१६ खेळा : जर तुम्हाला एखादी प्रक्रीया गोंधळात टाकत असेल किंवा त्रास देत असेल. तर तिच्याबरोबर खेळा. हेतु शोधू नका जोपर्यंत तुम्ही स्पष्ट नाही आहात.
१७ दूर करा : ज्या गोष्टीत तुम्ही मजा अनुभवु शकत नाही ती करण्यात वेळ घालवू नका. एकतर त्यात पॅशनची वरीलप्रमाणे निर्मीती करा किंवा ती दूर करा.
संकलन – अमोल सातपुते
Leave a Reply