नवीन लेखन...

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला.

लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते.

साळवे हे आडनाव , तर राऊत ही पदवी होय. लहुजींचे वडील राघोजी मराठेशाहीत पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी होते. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या.

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत या पदवीने गौरविले होते. लहुजींचे घराणे शूरवीर लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपला मुलगा लहुजीलादेखील, एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची युद्धकलेची तालीम दिली. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्ध लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली.

महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले.

अठराशे सत्तावनच्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.

लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलित घरात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला.

फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत.

लहुजी वस्ताद साळवे यांचे १७ फेब्रुवारी १८८१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..