MENU
नवीन लेखन...

‘कृपा’ म्हणजे काय?

मला एका भक्ताने प्रश्न विचारला,”कृपा” म्हणजे काय?

मी तोच प्रश्न रोज माझ्या सानिध्यात असलेल्या साधक भक्ताना विचारला.आपापल्या परीने उत्तर देण्याचा काहींनी प्रयत्न ही केला,काहींनी मला काही समजले नाही असे ही उत्तर दिले,काहींनी मेसेज वाचला पण….

मानवप्राणी जन्मताच बुद्धिवादी आता त्या बुद्धीचा वापर कसा करायचा हे त्याला त्याच्या संगतीवर अवलंबून असते,म्हणजेच सदविचारांची बैठक असेल त्या प्रमाणे त्याचे विचार शक्ती काम करते!ज्या अघटीत शक्तीने ही सृष्टी निर्माण केली त्याचा एक नियम ठरला आहे जे पेराल तेच उगवेल! म्हणजेच त्या अघटीत शक्तीशी तुम्ही एकरूप झाल्यास त्याची फलश्रुती तुम्हाला जाणवते-कळते.

ही अघटीत शक्ती वेगवेळ्या रूपामध्ये स्थित आहे कोणी त्याला राम,कृष्ण,गणपती,मारुती,दत्त स्वामी अश्या अनेक रूपामध्ये त्या अघटीत शकतील अनुभवत असतो! म्हणजेच ह्या शक्तीच्या ठिकाणी भक्तीने, प्रेमाने श्रद्धेने तो त्या शक्तीला अनुभवत असतो. हे केव्हा घडते,जो साधक साधना करताना अनन्य भावाने शरणागती पत्करतो,अर्थात आपल्या बुद्धीचे क्षेत्र बंद करतो त्याच वेळी म्हणजे जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे हे सगळे माझे आराध्य दैवत करत आहे ही जाणीव होणे म्हणजे कृपा!

कृपा ही जाणून घेण्याची गोष्ट आहे! उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्थेतून प्रत्येक जीव वाटचाल करत असतो. दासबोधात रामदास स्वामीनी जन्म हेच दुःख आहे असे म्हटले आहे, तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून ह्या भाव सागरातून मुक्त व्हायचे आहे,तू सद्गुरुंना शरण जा! हे सद्गुरू म्हणजे कोण? व्यक्ती का नाही! हे एक तत्व आहे ह्या आधी होते आत्ता ही आहे आणि पुढे ही राहणार आहे!

येथे केलेली कोणतीही गोष्ट फुकट जात नाही,हे अढळ सत्य आहे, ह्या विषयी अनेक कथा गुरुचरित्र ग्रंथात आलेल्या आहेत. त्या कथेमध्ये अनेक चमत्कार घडलेले वाचनात आलेले आहेत,ह्या ग्रंथातून तुमची भक्ती,श्रद्धा,प्रेम,विश्वास कसा ठाम असावा याची उदाहरण दिली आहेत, ज्याला दुःख झाले त्या भक्ताला त्या अघटीत शक्तीने कसे दुःखरहित केले त्याच्या कथा आहेत.

प.प.नरसिह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या भक्ताना असे सांगितले आहे मी काहीच केले नाही,मी निमित्त मात्र आहे जे झाले जे मी केले असे वाटते ते तुझ्या भक्तीमुळे, तुझ्या श्रद्धेमुळे घडले.

शुष्क कास्टाला पल्लव फुटले तेव्हा स्वामी महाराज म्हणतात ह्या भक्ताचा त्याच्या कर्मावर पूर्ण विश्वास होता त्याने ज्या भक्तीने श्रद्धेने विश्वासाने पाणी घातले त्यामुळे त्या अघटीत शक्तीला तेथे कार्यरत व्हावे लागले!
त्याच वेळी स्वामी महाराजांनी केलेला उपदेश अतिशय मौल्यवान आहे,त्यांनी सांगितले ह्या जगतात सात ठिकाणे अशी आहेत तिथे विश्वासच ठेवायचा असतो चिकित्सा करायची नसते!1)मंत्र 2)तीर्थक्षेत्र 3) ब्राम्हण कर्म 4)आपले कुल दैवंत 5) ज्योतिषी 6) औषध आणि 7) सद्गुरू!

तुमची जशी श्रद्धा,विश्वास प्रेम भक्ती जसजशी वाढत जाईल तशी तुम्हाला अनुभूती जाणवू लागेल ती जाणवणारी भावना म्हणजे कृपा!

मला माझ्या सद्गुरूंनाथ महाराजांच्यामुळे जी जाणीव झाली ते लिहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे,जे चुकीचे असेल ते माझे आहे आणि जे सत आहे ते माझ्या सद्गुरूंचे आहे. मला जी जाणीव झाली ते लिहण्याचा प्रयत्न केला,ह्याही पेक्षा वेगळी अनुभूती तुमच्या पैकी साधकांना आली असेल ती लिहून पाठवलास मी तुमचा ऋणी राहीन कारण सद्गुरूंनी दिलेल्या दृष्टीची खोली कोणीही मोजू शकत नाही.

सद्गुरूंनाथ महाराज की जय!

— सद्गुरू चरणरज पाध्येकाका

पाध्येकाका, वसई
About पाध्येकाका, वसई 10 Articles
वासुदेव शाश्वत अभियान,वसई गेली 24 वर्षे आपणा सर्वांच्या सहकार्याने तसेच सद्गुरुंच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..