डांबले उरी, मी दुःखवेदनांना
आज विकल अव्यक्त भावनां
संवेदनांचे सारे स्पर्श वेगवेगळे
दाह अंतरी सोसू कसा सांगना
विधिलिखित! जरी हे ललाटी
भोगूनी संपणार कां? सांगना
सत्कर्मी! चालतोही मी विवेके
तरी अस्वस्थ मन हे कां सांगना
क्षण! तू तर सारेसारे जाणतेस
तरीही तू कां? अबोल सांगना
मीच शोधितो, स्वतःला अंतरी
जीवन! कधी उमगणार सांगना
जीव! हा व्याकुळ आज सारा
कृपावंत! कधी भेटणार सांगना
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ५४
२१ – २ – २०२२.
Leave a Reply