नवीन लेखन...

कृष्णाकाठच्या कथा…. खेळ सूर पारंब्याचा

मी शाळा शिकत असताना अभ्यासाबरोबर साहित्याचे लेखन सुद्धा करीत असे. बालभारती पुस्तकातील धडे किती सुंदर असतात यामुळे मला एक लिहिण्याची उर्मी येत असे. आपणही थोडेफार लेखन करावे असे माझ्या मनाला मनोमन वाटत होते. शाळा शिकत असतानाच नाटकात काम करण्याचा छंद मला लागला होता व भजनात सुद्धा माझे मन गुंतत होते. वडील जिवंत होते तोपर्यंत मी अधून मधून लेखन करीतच असे. शाळा शिकत असताना माझे अभ्यासाकडे लक्ष जास्त नव्हते थोडेफार होते परंतु माझे हस्ताक्षर चांगले असल्यामुळे शाळेतील गुरुजी मला. एखाद्या वेळी चुकले तर जास्त मारत नव्हते. माझे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे मला गुरुजी हजरीतील मुला मुलींची नावे लिहायला सांगत असे त्याचप्रमाणे शाळेत तक्ते करणे फळ्यावरती सुंदर अक्षराने. रंगीबेरंगी खडूने सुविचार लिहिणे त्यामुळे मी सर्वच गुरुजींचा लाडका विद्यार्थी झालो होतो. परंतु मी खेळकर जादा असल्यामुळे शाळेतील बरेच विद्यार्थी घेऊन शाळेच्या पटांगणामध्ये. कबड्डी, 35 मीटर धावणे, असे खेळ त असे. त्यावेळी माझे खेळायचे दिवस होते याचबरोबर लेखन नाटक बसवणे नाटकात काम करणे हे तर चालू होतेच. बुरुंगवाडी गावामध्ये रामलीला हा एक कार्यक्रम बसवला होता अधून मधून मी रामलीलेच्या तालमी सुद्धा पाहायला जात अस. अंगामध्ये कला आहे या कलेचे काहीतरी चीज झाली पाहिजे असे माझ्या मनाला नेहमी वाटत असे. त्याप्रमाणे मी ठोस पावले उचलत होतो मी पुढे कोण होईल हे मला माहित नाही तरीपण माझा प्रयत्न इतरापेक्षा वेगळे काहीतरी करायचे. ही अभिलाषा मनामध्ये फार होती परंतु आमच्या घरातील लोकांना हे सारे विषय पटत नव्हते आईला वाटायचे. माझा मुलगा माझ्या भावासारखा शाळेत शिकवाय मास्टर व्हावा आईचे सुद्धा बरोबर होते पण माझ्या नशिबामध्ये काय लिहिले आहे तेच घडत राहणार आणि घडणार….।

….. आई वडील आजी होते तेव्हा हाय फार मोठा आधार होता आणि हे तिघेजण मला चांगला सपोर्ट करीत होते. मनाला सुद्धा बरे वाटत होते कारण शाळा सुटली म्हणजे घर माणसांनी भरलेले असायचे. वडील जरी रेल्वे मध्ये असली तरी सुट्टीवर दोन दिवस यायचे सर्वांनी रात्रीच्या वेळी एकत्र जेवण करायचे. हा नियम मात्र घरासाठी कायमस्वरूपी लागू झाला होता एकत्र जेवल्यामुळे फार मजा येते जेवण करीत असताना. वेगवेगळ्या विषयावरती चाललेल्या गप्पा चांगल्या रंगत होत्या मला वाटते आमच्या रात्रीच्या गप्पा झाडावरच्या पशु पक्षांना सुद्धा पटत असाव्यात. आमच्या घरातील आवाज ऐकून झाडावरचे पशुपक्षी सुद्धा झाडाच्या ढाळीवर हालचाली करत होती हे मला जाणवत होते. मी आईला म्हणालो,,
,, आई..।
,, काय रे पोरा तुला काय म्हणायचं आहे का आई म्हणाली..।
,, अग आज शुक्रवार उद्या शनिवार उद्या आर्धी शाळा आहे मी म्हणालो..।
,, मग पुढे काय आई म्हणाली..।
,, उद्या दुपारी माझ्या शाळेतील सर्व मुले दादांच्या फुल बागेमध्ये आंब्याचे फार मोठे झाड आहे. त्या झाडावर आम्ही उद्या दुपारपासून सूर पारंब्याचा खेळ खेळणार आहे तुझं मत काय आहे मी म्हणालो..।
,, मग खेळाकी. मी नको म्हणत नाही पण हात पायाला सांभाळून खेळा आणि खेळताना भांडणे काढू नका. तुमचा खेळ व्हायचा दीड दमडीचा आणि भांडण गावातून आपल्या शेताकडे यायला नको. आपले घर इज्जतवान आहे हे दोन गावाला माहित आहे त्यात तू खेळकर मुलगा तुझे वडील तुझी आजी व मी. तुला कसे सांभाळून घेतले आहे हे मला माहित दोन मुलांच्या पेक्षा तू एक वेगळा मुलगा आहेस आई म्हणाली..।
,, आई भांडण तंटा काही होणार नाही पण सूर पारंब्याचा खेळ मला झाडावर चढून खेळायचा आहे. मी शाळेतील सर्व खेळ खेळलो आहे हा फक्त खेळ खेळलो नाही मी म्हणालो..,,
.. आईने लगेच होकार दिला माझ्या मनाला समाधान वाटले खरंच सूर पारंब्या हा काय खेळ आहे याची मला ज्ञान होईल. मी शुक्रवारी रात्री जेवण करून थोडा अभ्यास करून झोपी गेलो. सकाळ झाली आई म्हणाली लवकर आंघोळ कर आज सकाळची शाळा आहे. मी चटकन उठून दात घासले आणि आंघोळ केली धुतलेली कपडे घातली सकाळची शाळा आहे म्हणून चहा पिऊन मी शाळेकडे गेलो. शाळेतील माझ्या वर्गातील सर्व मुलांना सांगितले शाळा सुटल्यानंतर आज दुपारी व उद्या दिवसभर सूर पारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडावर खेळायचा. सर्व मुलांनी मान्य केले नियमाप्रमाणे शाळा सुटली व माझ्या वर्गातील सर्व मुले आमच्या रानात आली मला सुद्धा फार आनंद झाला. आणि आम्ही सर्वजण दादाच्या बागेतील आंब्याच्या झाडावर चढलो आणि सूर पारंब्याचा खेळ खेळू लागलो. हा खेळ बराच वेळ चालू होता. खेळताना आंब्याच्या झाडाच्या फांद्या हलत होत्या पण माझ्या वर्गातील मुले मनामध्ये भीत नव्हती. मी सुद्धा त्यांच्याबरोबर सूर पारंब्याचा खेळ खेळत होतो मी भयंकर वर झाडावर गेलो होतो. खालच्या झाडाची फांदी कुणीतरी हलवली आणि मी वर असल्यामुळे मी एका बारीक फांदीला हात धरला होता. झाडाची फांदी जास्त हल्ल्यामुळे माझा हात बारीक फांदीवरून खाली आला. आणि मी जमिनीवर खाली कोसळलो व माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हात सुंद झाल्यामुळे मला काही कळेना म्हणून माझ्या वर्गातील आनंदा जाधव हा आमच्या छपराकडे पळत गेला. आणि त्याने सारी हकीगत सांगितली आई व आजी पळत दादांच्या बागेत आली. आई ओरडली काय झालं बाळा पण मी आई बरोबर व्यवस्थित बोलू शकत नव्हतो चटकन आईच्या लक्षात आले हा झाडावरून पडला आहे. लगेच आईने तानाजी बापूंना हाक मारली आणि मला सरकारी येळावी दवाखान्यामध्ये घेऊन गेले. मी झाडावरून पडल्यामुळे भीतीने माझ्या वर्गातील सारी मुले गावाकडे पळून गेली हे मी पाहत होतो. येळावी सरकारी दवाखान्यांमध्ये भालेराव डॉक्टर होते त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि म्हणाले या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तुम्ही सांगलीला घेऊन जावा त्याप्रमाणे खाजगी गाडी करून मला सांगलीला घेऊन गेले. माझ्या उजव्या हाताला मजबूत बायडिंग केले माझ्या आईच्या मनाला वाटू लागले माझ्या मुलाचा उजवा हात बरोबर होतो की नाही. आई मला दवाखान्यात म्हणत होती मी तुला सांगितले होते हाता पायाला सांभाळून खेळ खेळ. तू किती अल्लड आहेस याचे गणित मला समजत नाही. सूर पारंब्याचा खेळ तुला किती महागात पडला हे तुझ्या लक्षात कसे येत नाही हा विषय तुझ्या बापाला समजला तर. काय होईल याचा विचार तू का केला नाहीस पंधरा दिवसानंतर माझा हात सरळ झाला आणि माझे मन म्हणू लागले. सूर पारंब्या चा खेळ अतिशय अवघड आहे खरंच लहानपणचा अज्ञान पण किती घातक असते याची परिचीती माझ्या मनात आली होती. हा सूर पारंब्याचा खेळ अजून माझ्या लक्षात आहे मी अज्ञान असल्यामुळे घरातील लोकांना झालेला त्रास मला जाणवत होता. पण तो त्रास मला जाणवत होता. घरातील लोकांना त्रास देणे हे मला पटत नव्हते पण काय करायचे लहानपणाचा खेळ तरी खेळायला हवा..

… पूर्णविराम..।

दत्तात्रय पांडुरंग मानुगडे…।

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..