MENU
नवीन लेखन...

कृष्णविवर आणि त्याचा शोध

जसं माणसाचं जीवनचक्र असतं, तसंच तार्‍यांचही जीवनचक्र असतं. माणसाप्रमाणे तार्‍यांचाही मृत्यू होत असतो. तार्‍यांच्या आतील भागात वेगवेगळ्या क्रिया होत असतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जा तार्‍याचं प्रसरण घडवून आणते त्याचवेळी तार्‍याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचं आकुंचन होते असतं. जेव्हा तार्‍यांच्या आतीलभागात केंद्रकीय क्रियांतून निर्माण होणारी ऊर्जा, गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या आकुंचनाला थांबवून धरते तेव्हा ही दोन बले समान होतात आणि ताऱ्यांचा आकार कायम राखला जातो.

जेव्हा तार्‍यातील ऊर्जा ज्याला केंद्रकीय इंधन म्हणतात ते संपुष्टात येते तेव्हा ही ऊर्जानिर्मिती थांबते आणि गुरुत्वाकर्षणाचा होणारा विरोधही संपुष्टात येतो. त्यामुळे तारे आकुंचन पावू लागतात आणि ताऱ्यांचा आकार कमी होत जातो. जसा आकार खूप कमी होतो तसं तार्‍यातील अणुंना जागा कमी पडू लागते व अणुंच्या आतील इतर बले या गुरुत्वाकर्षणाला विरोध करतात .जर आपण अतीजड ताऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं , तर अणुंच्या आतील बले ही होणारे आकुंचन रोखण्यासाठी अपुरी पडतात आणि तार्‍याचं संपूर्ण वस्तुमान एका बिंदुवत जागेत एकवटले जाते.

या बिंदूला सिंग्युलॅरिटी म्हणतात.संपूर्ण ताऱ्यांचं वस्तुमान बिंदूवत जागेत सामावल्याने त्याची घनता प्रचंड वाढते. प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं याचा परिणाम म्हणून याठिकाणी भौतिकशास्त्राचे नियम मोडून पडतात आणि प्रकाश सुध्दा यातून बाहेर पडू शकत नाही. प्रकाश बाहेर पडत नसल्याने आता हा तारा आपल्याला दिसत सुध्दा नाही. अशा या तार्‍यावर पडणारी कोणताही वस्तू या साऱ्याचाच भाग बनून जाते आणि ती परत बाहेर येऊ शकत नाही . त्यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर असे म्हणतात.जर कृष्णविवराच्या शोधाबद्दल बोलायचं झालं, तर फ्रेंच शास्त्रज्ञांनी १८ व्या शतकात ही संकल्पना प्रथम मांडली परंतु, या संकल्पनेला मिळालेली `कृष्णविवर ‘ ही संज्ञा जॉन आचगबाल्फ्ड व्हीलर या अमेरिकन शास्त्रज्ञाने सुमारे 65 वर्षांपूर्वी प्रचलित केली होती.

आईन्स्टाईनने सांगितलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धान्तामध्ये सर्वप्रथम कृष्णविवराच्या अस्तित्वासंबंधी शक्यता निर्माण झाली. गुरुत्वाकर्षणाचा काळावर कसा परिणाम होतो ते या सिद्धान्तामुळे स्पष्ट झाले. कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली. पुढे १९६० च्या दशकामध्ये शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांनी गणिताच्या आधारे विश्वातील कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना २०२० साली नोबेल पारितोषिक दिले गेले.सर्वप्रथम कृष्णविवराचा शोध, अठराव्या शतकापासून सुरू झाला व त्यामुळे `कृष्णविवर ‘चा शोध तेव्हा लागला ,असं म्हणता येईल .

लेखक-  अथर्व डोके

मोबाईल क्रमांक – ७२७६१३३५११

ई-मेल – vidnyandarpan@gamil.com

Website – www.vidnyandarpan.in.net

Avatar
About अथर्व डोके 16 Articles
लेखक हे विज्ञान दर्पण वरचे मुख्या लेखक आहेत. त्यांचे लेख विविध संकेतस्थळावरती आणि विविध अंकांमध्ये प्रकाशित होतात. लेखक हे विज्ञानातील विविध विषयावरती लिहितात. आपण लेखकाशी माध्यमाद्वारे संपर्क समजू शकता. मोबाईल क्रमांक - ७२७६१३३५११ ई-मेल - atharvadoke40@gamil.com संकेतस्थळ - vidnyandarpan.in.net

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..