नको नको ते जीवन जगणे,
हिशोब ज्याचा राही उणे,
काय मिळवीले येऊन जगती,
खंत याची सदा वाटणे ।।१।।
ज्वाला बनुन विझूनी जाणे,
ऊर्जा वाटीत सर्वांना,
मंद मंद ते जळत राही,
धुरांडे ते काही देईना ।।२।।
लखलखाट तो करीते वीज,
क्षणीक राही नभांगी,
मिन मिननारा दिवा अंगणी,
अल्प प्रकाशी बाह्यांगी ।।३।।
किती काळ अन् कसे जगला,
हिशोब याचा कुणी करेना,
कष्ट त्याग तो बघती सारे,
काय दिले तुम्ही इतरजना ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply