नवीन लेखन...

क्रिसटीना स्कारबर्क–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

क्रिस्टीना स्कारबेक — दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

क्रिस्टीना स्कारबेक,चा जन्म १ मे १९०८ ला एका संपन्न ज्यू घरात  झाला.तिला वडिलांप्रमाणे घोडेस्वारीचा,.स्कीईंग करण्याचा छंद होता.या सगळ्याला तिच्या वडिलांचे प्रोत्साहन होते.१९२० मध्ये त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आणि त्यांना वॉर्सोमध्ये स्थलांतर करावे लागले.घरच्यांवर बोजा होऊ नये म्हणून तिने फियाट मोटार मध्ये डीलर म्हणून काम केले. पण थोड्याच दिवसात ती आजारी झाली आणि तिला नोकरी सोडावी लागली.डॉक्टरांनी तीला मोकळ्या हवेत वावरण्याचा सल्ला दिला.म्हणून ती आपला बराचसा वेळ Tatra,पर्वतावर हायकिंग व स्कीईंग करण्यात घालवू लागली. ०२ नोव्हेंबर १९३८ला तिने गीझाकीशी लग्न केले.दुसरे महायुद्ध सुरु झाले म्हणून  त्यांना लंडनला स्थलांतर करावे लागले.फ्रेडरिक वोईत याने तिला Secret Intelligence Service(SIS) मध्ये भरती करून घेतले.ती स्कीईंग खेळणारी,व धाडसीपणामुळे ओळखली जाई.

ब्रिटीश एजंट म्हणून तिला हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात २१ डिसेंबर १९३९मध्ये पाठवण्यात आले.तिने जॉन मारुसा ह्याला नाझी व्याप्त पोलंड मधून निसटून जाण्यासाठी मदत करायची विनंती केली. १९४०ला अचानक तिची मैत्रीण cafe मध्ये भेटली व ओळख दाखवली पण क्रीस्तीनाने ओळख न दाखवता तिथून निसटली.बुडापेस्ट मध्ये जानेवारी १९४१रोजी हन्गेरिअन पोलिसांनी तिला कटक केली.  नाझी गेस्टोपोनी उलटतपासणी घेतली तेव्हा तिने जीभ चावून  रक्तबंबाळ केली.आणि त्यामुळे डॉक्टरांनीतिला टीबी झाल्याचे सांगितले.तेव्हा तिला सोडण्यात आले.पण पाळत ठेवण्यात आली.तीने हंगेरीला परतण्याचे ठरवलं.हंगेरीतील ब्रिटीश अमबेसीने त्यासाठी तिची ओळख बदलली.खोटा पासपोर्ट तयार केला गेला.ती व तिचा मित्र कोवेर्स्की यांना ब्रिटीश एमबसीत बोलावण्यात आले.जिथे त्यांनी मायक्रोफिल्म दिल्या ज्यात जर्मन सोविएत रशियावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती.हि माहिती ब्रिटनचे पंतप्रधान चर्चीलना देण्यात आली. जून १९४१मध्ये जर्मनीने रशियावर हल्ला केला.पुढे तिला इस्तंबूलमध्ये पाठवण्यात आले.

१९४१,१९४२, १९४३ मध्ये, स्कार्बकला  अनेक जबाबदार्या ब्रिटनच्या (SOE) तर्फे देण्यात आल्या. क्रिस्टीना स्कारबेक  आता क्रिस्टीन ग्रान्वील नावाने ओळखली जाऊ लागली.तिला ७ जुलै १९४४मध्ये पेराशूट मधून फ्रान्समध्ये उतरवण्यात आले.फ्रान्सिस केमेट तर्फे चालवल्या गेलेल्या जॉकी नेटवर्क मध्ये तिला सामील करण्यात आले. त्यांचा जॉब  फ्रेंच क्रांतीकारकांना एकत्र करण्याचा होता. क्रिस्टीना स्कार्बक केमेटची कुरिअर बनली.SOE च्या सर्व महिलांना मिलटरी दर्जा देण्यात आला.पुढे युद्ध संपेपर्यंततिने फ्लाईट ऑफिसर म्हणून काम केले.दुसऱ्या महायुद्धानंतर तिला जॉर्ज मेडल,officer of order of British Empire एवोर्ड देण्यात आले.दुर्दैवाने १५ जून १९५२ला तिचा खुन करण्यात आला.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 85 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..