‘आम्ही क्षमस्व आहो’ , मोबाइल बडबडताहे
‘तुम्ही क्षमस्व आहां , मग मीही क्षमस्व आहे’.
‘क्षमस्व’ म्हणजे काय , कुणां हें नक्की ठाउक नाहीं
करतां वापर हास्यास्पद , तिरकस प्रतिसादा मीही !
‘चूकच नाहीं’, अन् ‘सोऽ व्हॉऽट्’हि, भलता चढला पारा
क्षमस्व ; खून करुन भाषेचा, खुशाल माथीं मारा.
–
क्षमस्व : (संस्कृत) : क्षमा कर ( अशी विनंती).
– – –
– सुभाष स. नाईक