क्षण क्षणाने रंगुन गेला,?
क्षण क्षणात भंगुन गेला,?
क्षण क्षणांत रोम दाटले,?
क्षण क्षणांचे मोती झाले !?
क्षण क्षणांचे गुलाम झाले,?️
क्षण क्षणांत गुंतुन गेले,?
क्षण क्षणात चिंब न्हाले,?
क्षण क्षणांत क्षणिक झाले !?
क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨
क्षण क्षणांस ओझे वाटले,?️
क्षण क्षणात स्मृती भासले,?
क्षण क्षणात वाहत गेले !?️
क्षणात हसले , क्षणात रडले,?
क्षणात रडूनी हासू उडवले,?
क्षण क्षणांत मुरून विरले,?
क्षणात क्षणांचे क्षितीज झाले !?
— श्वेता संकपाळ.
२७-०६-२०१९
Leave a Reply