जरा विसावुया! क्षणभर येथे
स्मरुया , क्षणक्षण हरविलेले
आणि सावरू! क्षण उरलेले
जरा विसावुया! क्षणभर येथे ।।१।।
आठवांना! किती उसवावे
उलगडतांना सुख,दु:खांना
लोचनांनी किती ओघळावे
जरा विसावुया! क्षणभर येथे ।।२।।
आयुष्य सारेच रंगलेभंगलेले
तरीही आपण जगलो विवेके
दयाघनाची , ती ईच्छया सारी
आता विसावुया! क्षणभर येथे ।।३।।
प्रीतच आपुली , ऋणानुबंधी
स्पंदनी! नित्य उमलुनी येते
गंधाळुनी आसमंत दरवळते
चल सखये विसावुया! जरा इथे ।।४।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१६२.
२६ – १२ – २०२१.
Leave a Reply