नवीन लेखन...

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला

उद्योगपती

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्म १४ जून १९६७ रोजी झाला.

कुमार मंगलम बिर्ला….भारतीय उद्योगपती, देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन, बिर्ला इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲ‍न्ड सायन्सचे चान्सलर आणि आयआयटी, दिल्लीचे चेअरमन. बिर्ला ग्रुपचे मालक.
कुमार मंगलम बिर्ला यांनी सीएबरोबर लंडन बिजनेस स्कूरलमधून एमबीए पण पूर्ण केले आहे.

आदित्य बिर्ला हे बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या कंपन्यांमध्ये ग्रासिम, हिंडाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, आदित्य बिर्ला नुवो, आयडिया सेल्युलर, आदित्य बिर्ला रिटेल आणि कॅनडामधील आदित्य बिर्ला मिनीक्स आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीटस पिलानी) यासह देशभरातील ४० कंपन्यांचा समावेश आहे.

१९९५ मध्ये ‘आदित्य बिर्ला’ यांच्या आकस्मिक निधनानंतर कुमार मंगलम यांना. बिर्ला समूहा’ चे अध्यक्ष केले गेले. त्यावेळी ते फक्त २८ वर्षांचे होते आणि लोकांनी इतके मोठे बिर्ला साम्राज्य चालवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले, परंतु त्यांच्या कौशल्याने,, कष्टाने आणि विचारांनी त्यांनी आदित्य बिर्ला समूहालाच पुढे आणले नाही तर कंपनीचा विस्तारही नव्याने केला. भागात. केले. त्यांनी दूरसंचार, सॉफ्टवेअर आणि बीपीओमध्ये काम केले. अशा क्षेत्रात कंपनी विस्तारित केली आणि आधीपासून विद्यमान व्यवसायांना मजबूत केले.

भारता व्यतिरिक्त, आदित्य बिर्ला समूहाचा व्यवसाय थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, इजिप्त, कॅनडा, चीन आणि ऑस्ट्रेलियासह सुमारे ४० देशांमध्ये पसरलेला आहे. १९९५ मध्ये जेव्हा त्यांनी आदित्य बिर्ला यांची सूत्र हाती घेतली तेव्हा या समूहाची उलाढाल दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती जी त्यांच्या नेतृत्वाखाली वाढून ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली. बिर्ला समुहाने सुमारे एक लाख तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे आणि एकूण कमाईपैकी ६० टक्के हिस्सा परदेशातून येतो.

आदित्य बिर्ला समूहाच्या कंपन्यांव्यतिरिक्त, कुमार मंगलम बिर्ला यांनी विविध नियामक आणि व्यवसाय मंडळांवर अनेक महत्त्वाची आणि जबाबदार पदे भूषवली आहेत. ते कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या व्यापार आणि उद्योगविषयक सल्लागार समितीचे ते सदस्यही होते. तसेच उद्योग व वाणिज्य मंत्री यांनी स्थापन केलेल्या व्यापार मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्यही होते. २०१५ मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी मलबार हिल परिसरात ३० हजार चौरस फुट क्षेत्रात पसरलेल्या जटिया हाऊसची ४२५ कोटी रूपयांना खरेदी केली होती. फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. नोव्हेंबर २०२० नुसार दानशूरांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात २७६ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. आदित्या बिर्ला समुहाचे बिर्ला फाऊंडेशन शिक्षण,आरोग्य, सौरऊर्जा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. २०२१ च्या अनुसार केकुमार मंगलम बिर्ला यांची संपत्ती १३७० करोड अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळ जवळ १००३,२७,५६६.०० रुपये आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. कुमार मंगलम बिर्ला यांना लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती, परंतु व्यवसाया मुळे त्यांना क्रिकेट सोडून द्यावे लागले.

कुमार मंगलम बिर्ला यांना तीन मुले आहेत अनन्या, आर्यमन व अद्वैतेषा. त्यांचा मुलगा आर्यमन बिर्ला वडिलांचा व्यवसाय सांभळण्याऐवजी क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतोय. आर्यमननं रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये शतकही झळकवत स्वत:मधली क्षमता दाखवली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला ही गायिका आहे. अनन्या बिर्लाचे पहिले गाणे लिविन द लाईफ २०१६मध्ये आले होते. या गाण्यानंतर तिला युनिर्व्हसल म्युझिक इंडियाने सिंगर म्हणून साईन केल होते. याशिवाय ति ई कॉमर्स कंपनी क्युरोकार्टचीही फाऊंडर तसेच सीईओ आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..