सन 1980 ची गोष्ट त्यावेळी माझी आई घरामध्ये जळण नाही म्हणून. रानातून कुर्डू च्या फुलांच्या झाडाचे जळण डोक्यावरून एक मोठा भारा रोज घेऊन येत असे. स्वयंपाकासाठी घरांमध्ये वेळ नव्हते मी रेल्वेमध्ये नुकताच रेल्वेमध्ये कामाला लागलो होतो. त्यावेळी पगार महिना दोनशे रुपये पर्यंत मिळत होता. त्यामध्ये घरातील खर्च भागत नव्हता वडील या जगातून निघून गेल्यापासून. घरावर दुःखाचे सावट येत होते आणि संसाराला पैसे कमी पडत होते. घरामध्ये वातावरण तसेभकास मला दिसत होते रानातून आम्ही गावाकडे राहायला आलोहोतो. गावातील पुढचे घर पडले होते पुढच्या घराची तुळी खाली लोंबकळत होती. वडिलांच्या नंतर आम्ही कसेबसे दिवस काढत होतो आई घरासाठी व आम्हा तीन भावासाठी कष्ट उचलीत होती. मंडळी ही कुरडूची भाजी कोवळी असताना त्याची भाजी रानात राहिला.. असताना या भाजीची चव मला अजून आठवते या कुर्डू च्या झाडाची पाने कोवळी असली म्हणजे भाजी खाताना भयंकर मजा येत होती. परंतु ही झाडे मोठी झाल्यानंतर त्या झाडाला पांढरी शुभ्र फुले येतात. आणि शेवटी जळणासाठी या फुलांच्या झाडांचा उपयोग होतो. हे मला चटकन जाणवले लहान असताना प्रत्येक झाडाची कोवळी किमया. त्या पालांचा हिरवा रंग लहान असताना या झाडाला किंमत होती. परंतु हे कुरडू चे झाड मोठे झाल्यामुळे या झाडाला जळण म्हणून वापरले जाते. खरंच ही दुनिया आजब आहे परंतु कुरडू चे झाड मोठे झाल्यानंतर. या झाडाला जाळले जाते हे पाहून माझे हृदय हेलावले एवढे मात्र निश्चित.
… दत्तात्रय मानुगडे
Leave a Reply