नवीन लेखन...

कुरतडलेला नकाशा हिंदुस्थानचा

१५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही. कारण सध्याचा नकाशा फाटलेला आहे. त्याच्या चिंधड्या उडालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर कुरतडलेला आहे. आपल्या ढोंगी राज्यकर्त्यांनी आपल्या पौरुष्याच्या चिंधड्या उडवल्या, जशा आपल्या निष्ठेच्या चिंधड्या उडवल्या, जशा आपल्या चारी9-याच्या चिंधड्या उडवल्या अगदी तशाच आपल्या नकाशाच्या चिंधड्या उडवल्या. खरा नकाशा आपण पाहिलात का? कदाचित आपल्या देशातील जेष्ठ नागरिकांना, आपल्या माता-पित्यांना आठवत असेल. परंतु आजच्या तरुणांचे काय? येणाऱ्या भावी पिढीचे काय? त्यांनी तो नकाशा पाहिलाच नसेल किंवा या स्वार्थी राज्यकर्त्यांनी दाखवलाच नसेल. आपल्या या नकाशात प्रचंड पुण्यशील सिंधनदी, हिंदुकुश पर्वत हे सर्वांगसुंदर हिंदुस्थानाच्या दारात घातलेले सडे, काराकोरमची रम्य रांगोळी या भूप्रांताला सिंधू देश म्हणत. ही नगरी शिबी राज्याच्या किर्तीसौख्याने सुगंधीत झाली होती. पंजाब म्हणजे पाच देवींचा पाळणा. त्या पाळण्यावर काश्मिर सुगंधी फुलांचे-फळांचे गुच्छ लटकावून बसले होते. शतदु, व्यास, रावी, जेहलम आणि चिनाब या त्या प्रसिध्द नद्या. त्या नद्यांचे असंख्य स्वर प्रत्येक हिंदूच्या कानात एखाद्या गर्जनेसारखे त्या पंचनद्यांच्या कोलाहली सारखे दुमदुमत होते. ते क्रषिंचे आश्रम ते निर्भिड अरण्य, त्या नूतन नगरी, शांत आलाप घेणारा तो छोट्या गोपगोपिकांचा, पावा ते पौरसाचे तळपते शौर्य, ते देबालचे पतन, तो दाहिरचा आत्मयज्ञ, वारंवार येणाऱ्या हिंदू विरांच्या त्या अनामिक सेना, त्यांच्या रक्तांनी पुन्हा रंगून गेलेल्या त्या पाच नद्या? कुणाचा होता तो पुण्य-पावन प्रदेश?

जी जन्मभूमी आपल्या हिंदुची होती, ती मृत्यूभ्रूमी झाली. जे आम्हांला वरदान होते. ते आभिशाप झाले. जे आपले होते ते ‘परक्यांचे झाले. आपल्याच पंजाबात आपण परके झालो. तो सिंध प्रांत आपला राहिला नाही. पाच नद्या आपल्या राहिल्या नाहीत. आठवा तो स्वकीयांच्या रक्‍तात बुचकाळून निघालेला पूर्व बंगाल, नंतर ज्याचा पूर्व पाकिस्तान झाला आणि आता अस्तित्वात असलेला बांगला देश. ही सुध्दा एक सत्य घटना आहे. थोडी अधिक भयंकर घटना. थोडी अधिक रक्‍तरंजित घटना. थोडी अधिक अस्वस्थ करणारी घटना आणि बऱ्याच अंशाचे आत्ताच काही वर्षापूर्वी घडलेली घटना.

ज्या घटनेने तुम्हांला धक्का बसेल. ज्या घटनेने तुमचे हृदय पिळवटेल ज्या घटनेने तुमचा आत्मा कळवळेल. साहजिकच तुमच्या मनात प्रश्‍न उभा राहिल. हे सारे काय आहे? तर ऐका. त्या पूर्व बंगालात ज्या सहस्त्रावधी हिंदूला अग्निच्या प्रखर ज्वाळांनी भाजून काढले. ज्यांचे कंठनाळ छेदले गेले. जी अर्भके दगडांनी ठेचली गेली कारण ती हिंदू होती. ज्या विवाहित स्त्रीयांच्या कपाळावरील मंगल सौभाग्य-चिन्ह पिशाच्चास व पशूस मागे ठाकणाऱ्या नाचांच्या पापी पायांनी पुसले गेले. ज्या कुमारीका होत्या त्यांच्या कौमार्यांचे धिंडवडे काढले. त्यांच्या विवाहाचे पाश बलात्काराच्या जहरी सुरीने कापून काढले. ज्या हिंदू स्त्रियांना मुस्लिमांनी नासविले त्या आपल्याच आयाबहिणींना आपण स्विकारले नाही आणि ज्या मुस्लिम स्त्रिया आपल्याशी शरण आल्या त्यांना त्या मुस्लिम म्हणून स्विकारले नाही, त्या साऱ्यांसाठी आपण काय केले?

हिंदूस्थानचे नंदनवन असलेले काश्मिर, त्याचा एक तृतीयांश भाग म. गांधीच्या मेहरबानीने निर्माण झालेल्या पाकिस्तानने गिळंकृत केला. मोतिलाल नेहरूंच्या पाक प्रेमाचे प्रतिक उरलेल्या अर्ध्या काश्मिर मध्येही मुसलमानी दहशतवाद्यांनी तेथील हिंदू पंडितांना हद्दपार केले. तेथील निर्वासित झालेले लाखो हिंदू पंडित आजही आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात केविलवाणे जीण जगत आहेत. आणि आपल इटालियन कांग्रेस सरकार तेथील पाकिस्तानवादी देशद्रोह्यांना चमचमीत बिर्याणीचे जेवण जेवू घालत आहे. आपले राजकीय नेते त्यांच्या गळ्यात गळे घालून केवळ मतांच्या राजकारणासाठी हिंदूच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यांचे सर्व लाड पुरवित आहेत.मशिदीतून जाहिरपणे देण्यात येणाऱ्या हिंदुस्थान विरोधी घोषणांवर साथी दखल घेतली जात नाही. हिंदुस्थानच्या भूमीवर हिंदुस्थानचा ध्वज फडकवण्यासाठी मुरली मनोहर जोशी, साध्वी उमा भारती यांच्या सारख्या प्रखर राष्ट्रभक्तांना बंदी घालण्यात येते. ईशान्यकडील प्रदेशातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील, अनेक प्रसंग देता येतील. अनेक घटना दाखविता येतील. अशी ही आपल्या भारतमातेची भग्नमूर्ती असा तिचा हा विछिन्न देह. सर्वांना हा प्रश्‍न विचारावासा वाटतो, कुठे आहे तिचा लखलखणारा मुकुट? कुठे आहेत तिची खणखणारी कंकणे? कुठे आहेत तीचे वायबाहू? कुठे आहेत तिच्या दक्षिण शुजा? कुठे आहेत तिची पाच पाणीदार शस्त्र.या माझा हिंदुस्थानच्या आशास्थानांनो, तरूणांनो, तरुणींनो, आपली मातृभाषा अशीच होती का यासाठीच का आपल्या पूर्वजनांनी सारे तप, यासाठीच कठोर व्रत, यासाठीच रक्तधारा, यासाठीच मस्तकमाळा, यासाठीच उग्र त्याग केला होता? हे सारे मूर्तिभंजनासाठी, मातृघातासाठी, आत्महिंसेसाठी हिचा द्रोह करून हिला विटंबित करून आता आपण कोणत्या नकाशाची, कोणत्या भारतभूची, कोणत्या तिरंग्यांची पूजा कराल?

कच्छचा ५४० चौरस मैल कांजरकोठ प्रदेश आपल्या षंढकाँग्रेसी राजकर्त्यांनी पाकिस्तानला दान दिला. लडाखचा तेवीस हजार चौरस मिटर प्रदेश चीनने व्यापला बंगालजवळचा सिल्हेठ जिल्हा पूर्व पाकिस्तानला दिला. अगदी परवा तीन बिघा भूपटटी बांगलादेशला दान दिली. एवढे कमी पडले म्हणून की काय बंगालच्या उपसागरातील कच्छ तिबू बेट श्रीलंकेला दिले. अपवाद फक्त एकच तो म्हणजे पाकिस्तानने गिळंकृत केलेला कारगिलचा प्रदेश, परंतु मिळाला त्याचे श्रेय केवळ हिंदुस्थानचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान प्रखर राष्ट्रभक्त अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामुळे. आपला मूळ नकाशा मातृघातकांनी फाडला, त्याला कुरतडवून कुरतडवून संकुचीत केले. तुम्ही तेथे आपला काश्मिर शोधू नका.

तेथे तुम्हाला सिंधू सापडणार नाही. तुम्हांला तेथे चितगांव सापडणार नाही. पुरूषपूर, शिबी, देवाल, श्रीपूरा, सारं काही या नकाशातून फाडून फेकून दिल आहे. तुम्ही चाफेकर बंधूना विचारा, खुदीरामला विचारा, भगतसिंगांना विचारा, नेताजी सुभाषचंद्रांना विचारा, स्वा. वीर सावरकरांना विचारा, लाला लजपतरायांना विचारा लोक. टिळकांना विचारा, डॉ. हेडगेवारांना विचारा, हे सारे आपल्याला ओरडून सांगतील. हा नकाशा वंचनेचा आहे. हा नकाशा विद्रोहाचा आहे. आमच्या रक्ताने रंग देऊन जे तेजस्वी चित्र रंगावे ते नव्हे अजूनही फारसा वेळ गेलेला नाही. आपल्या हिंदुस्थानचा नकाशा कुणी फाडू नये अस खरोखरच आपल्याला वाटत असेल तर अशांचा द्वेष करायला शिका. द्वेषाचाच अग्नि पेटवा. द्वेषाचीच शस्त्रे पारजा. ज्यांनी विच्छेदन केले त्यांचेच विच्छेदन करा. ज्यांनी देशाच्या बांधवांना मृत्यूदिला, त्यांना मृत्यू द्या. आता हेच आपले जीवनगीत हवे. हेच आपले जीवनकार्य हवे. हाच आपला जीवनमंत्र हवाय. जे जे काही भूतकाळात ढासळलं, मोडलं, पुसलं, फाडलं कुरतडलं ते सार पुन्हा वाढलं पाहिजे, पुन्हा मांडलं पाहिजे, प्रथ्न हा आहे हा भव्य नकाशा कोण पुन्हा काढील? हे रम्य चित्र कोण रंगवणार? आपल्या भारतमातेचा गौरव, भारतमातेचे हे सारे अलंकार तिला पुन्हा कोण अर्पण करणार? कोण मूर्ति घडविणार? कोण प्रतिष्ठापना करणार? त्यासाठी केवळ मी, केवळ तू, केवळ तुम्ही करुन चालणार नाही त्यासाठी प्रत्येक हिंदुने ज्याच्या अंगात लाल नाही तर भारतमातेचे भगवे रक्त सळसळत आहे. त्या प्रत्येकाने हे विटंबित भारमातेचे मानचित्र नव्या रंगाने रंगवले पाहिजे. तर आपल्या भारतमातेचा नकाशा साऱ्या जगात तेजस्वी दिसेल. मग आपण सारे आजच्या दिवसाला स्वाभिमानाने म्हणू “सारे जहासे अच्छा नक्शा हिंदुस्तान का.

विद्याधर ठाणेकर

तरूण भारत (सोलापूर) १५ ऑगस्ट २००५

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..