नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल (प्रकरण १)

संगीता आईच्या गळ्यात पडत गोड बातमी देत होती ‘स्टेट बॅंक नरीमन पॉईंट येथे माझी ऑफीस्रर म्हणून नेमणूक. शैलजा बाईच्या डोळ्यासमोर गेल्या २० वर्षातला काळ झपाझप उलगडत होता. एका सन्ध्याकाळी बाबा ऑफीस मधून आले आणी चहा घेता कोसळले, संगीता ८ वर्षाची तर विजय ४ वर्षाचा. हिंदू कॉलनीत ५ व्या गल्लीत दोन खोल्यात दिवस रात्र शिकवण्या दिवस भर शाळेत नोकरी, संसाराची गाडी रेटत होत्या, हा सोन्याचा क्षण उगवला आणी मराठे कुटुंब आज प्रथम आनंदोत्सव साजरा करणार होते.

संगीता अतिशय सालस देखणी, प्रभावी व्यक्तीमत्व, समजूतदार आपल्या हिमतीवर सर्व शिक्षण पुरे केलेले, आईने आपल्या केत काढलेल्या ख्स्तांची जाण होती. ऑफीस मध्ये आपल्या कामात अतिशय चोख, एक तडफदार अधिकारी म्हणून ती प्रकाश झोतात आली होती. आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवताना दोघी गहीवरून गेल्या होत्या.

संगीता आता ऑफीसच्या कामात छांन रुळली होती. आपल्या केबीन मध्ये लोन संबंधित फाईलल्स बघण्यात गर्क होती, अचानकपणे मॅनेजर दिलीप चिटणीस एका तडफदार व्यक्तीबरोबर तिच्या केबीनमध्ये शिरले. तुमची ओळख करून देतो ‘हे श्री बिपीन नायर, afcon engineering company specialized in hydro electric power generation चे मुख्य इंजिनियर असून त्यांची कामे नेपाळ, सिक्कीम भागात चाललेली आहेत, याना आपण पूर्वी लोन दिलेले असून आता त्यांच्या कामाची व्याप्ती वाढत जाणार आहे, आता या पुढे या कामा संबंधित सर्व जबाबदारी मि तुमच्यावर सोपवीत आहे. बिपीन या आमच्या नवीन ऑफीस्रर संगीता अतिशय कार्यक्षम तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील, तुम्हीए केंव्हांही त्यांच्याशी संवाद साधू शकता.
बिपीनचे तडफदार व्यक्तीमत्व, बोलण्याची पद्धत त्याची हुशारी यांनी संगीताच्या मनात प्रथम पासूनच चलबिचल झाली होती कामा निमित्त वारंवार भेटी घडत होत्या. काही प्रसंगी त्याचा अहंकार उतावीळपणा जाणवत असे पण तरीही आंधळ्या प्रेमाचा अंकुर फुलू लागला होता.

पावसाळ्याचे दिवस, धुवाधार पावसाने जनजीवन पार विस्कळीत झालेले, बस ट्रेन याचा अभूतपूर्व गोंधळ. सन्ध्याकाळी साडे पाच वाजता संगीता आपल्या केबीन मध्ये घरी जायचे कसे या विचारात मग्न, अचानक टेबल वरचा फोन घणघणत होता. ”मी बिपीन बोलतोय, तुमची हरकत नसेल त मि माझ्या गाडीने तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू शकतो. अशा जीवघेण्या पावसात तिच्यापुढे पर्यायच नव्हता. गाडीत दोघांच्या अगदी मनमोकळेपणाने गप्पा सुरु झाल्या. संगीताला पहिला धक्का त्याने शुद्ध मराठीत बोलून दिला. मी मुंबईत १० वर्षे काढलेली आहेत, माझे वडील केरळी, आई बंगाली, ते त्रिवेंद्रम मध्ये राहतात, मी बांद्र्यात एकटाच असतो, माझ्याकडे काम करणाऱ्या बायका मराठी, व मला भाषा तशा लौकर आत्मसात करता येतात, मी बंगाली, मल्याळम. गुजराथी चांगले बोलू शकतो. मि माझ्या कामात अखंड डुबून गेलेला असतो. तुम्ही वर्कोहॉलिक म्हणाना, मी अनेक वर्षात माझ्या वडलांकडे गेलेलोच नाही. अरे ख्ररच गप्पा गोष्टीत मी विसरलोच, असे म्हणत त्याने सॅडविच बॉक्स काढला, दादर येई पर्यंत दोन तास गेले, वेळ तर फरच मजेत गेला,

संगीता एवढ्या पावसात जरा सुद्धा ओली झाली नाहीस, आईचे बोलणे कानावर पडले आणी ती गोड स्वप्ना तून जागी झाली. आईच्या मनात संगीताच्या लग्नाचे विचार घोळत होते, पुण्यातील आईची मैत्रीण पुष्पा भावे हिचा मुलगा डोळ्याचा सर्जन स्वत:चे नर्सिंग होम, दोन्ही कुटुंबाची २० एक वर्षाची चांगली ओळख, गप्पा गोष्टीत आईने अनेक वेळा सुचवून पाहिले, पण संगीता विषय टाळत पुढे बघू, असे म्हणायची पण नकारही देत नव्हती. पण गेल्या काही महिन्यात तिच्या मनात एक वेगळेच वादळ निर्माण झाले होते.

एका संध्याकाळी आई आनंदात आतुरतेने संगीताची वाट पाहत होती, ’ संगीता आजच पुण्याहून पुष्पाचा फोन होता, त्यानी आपणाला पहिल्या भेटी करता पुण्यात बोलावले आहे, शेवटी निर्णय तुम्हा दोघाना घ्यायचा आहे, आपण लवकरच पुण्याला जाऊ या ‘आईला समजवायचे कसे हा यक्ष प्रश्न संगीता पुढे होता, पण तिने धीराने पहिले पाऊल उचलले, ’आई, मला खरच भावेंच्या स्थळात आपुलकी नाही, खरतर तू माझे लग्न ठरविण्याची जबाबदारी घेऊच नको, योग्य वेळी मीच माझा निर्णय घेईन. ’आई तर क्षणभर सुन्नच झाली, आपली मुलगी आपल्या पासून दुरावलेली आहे, वाचारांचे काहूर माजले होते. आई वरील प्रेमाची जागा बिपीन वरील आंधळ्या प्रेमाने घेतली होती.

एकदोन वेळा बिपीन घरी आला होता, पण आई बरोबर संवाद नवता, आणि दोघांची मनाची तार जुळलीच नव्हती, संगीता मात्र त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेली होती. संगीताच्या लग्नाच्या निर्णयाने आई पार ढासळून गेली, आपल्या परीने समजावण्याचे प्रयत्न केले. प्रचंड झंजावातात दोघी एकमेकीं पासून दूर फेकल्या गेल्या होत्या, नियतीचे फासे वेगळेच पडू लागले होते.

— अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

1 Comment on कुस्करलेली कळी – उमललेले फुल (प्रकरण १)

  1. गोष्ट इंटरेस्टिंग वाटत आहे. आता दुसऱ्या भागाची वाट पहात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..