नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १७

वर्षा मागून वर्षे जात होती, आपल्या दु:खी जीवनाकडे संगीता तटस्थ वृत्तीने पाहू लागली होती. आपल्या कामात तिने झोकून दिले होते, आपल्या एकाकी जीवनात कोणताही बदल होणार नाही हे तिच्या मनानी पचविले होते, आपल्या नशीबाचे भोग आपण एकट्यानेच भोगले पाहिजेत हा वैचारिक बदल घडत चालला होता, आई बरोबर ज्ञानेश्वरी वाचनाने ती वेगळ्याच विश्वात वावरू लागली होती.

बिपीन मृणाल आणी त्यांचा मुलगा सौरभ ह्यांच्या त्रिकोणी कुटुंबात मौशूला काही स्थानच नव्हते. आता मृणालने नोकरी सोडल्याने ती पूर्णपणे बिपीनच्या दिमतीला होती, आपल्या जीवनातील हाही फासा त्याच्याच बाजूने पडला होता.

मौशु आपल्या हुशारीने धडाडीने परिस्थितीवर मात करत होती, आपल्या जीवनात आपणच बदल घडवावा लागेल ह्याची गाठ तिने मनाशी पक्की बांधली होती. त्या बरोबर तोंगशेचे मोलाचे पाठबळ पाठीशी होते. त्यांची Etho Moto कंपनी म्हणजे थिंपू शहरतील एक नावाजलेली कंपनी होती. या नावाचा अर्थ rhodenderon लाल चुटूक फुलांचा समूह, ही फुले हिमशिखरांच्या कुशीत वाढतात, पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी ही फुले भूतान देशाचे महान प्रतीक आहे.

मुंबईतील काही बॅंक अधिकारी, एकदोन कंपन्यांचे मालक, पर्यटन कंपन्याच्या दोन स्त्री अधिकारी असा एक ग्रुप भूतान देशात व्यापार, नवीन बॅंक शाखा उघडणे, व भूतान मध्ये पर्यटक आणणे अशा हेतूने थिंपूला भेट देणार होते. त्यांच्या संपूर्ण प्रवासाची आखणी Etho Metho कंपनीने केलेली होती कंपनीच्या आलेशान बसने महत्वाच्या स्थळांना भेट आयोजित केलेले होती. टान्ग्शे बरोबर त्यांचा मुलगा डोंग्जे व मौशुमीही प्रवासात असणार होते. मौशुनी भुतान मध्ये प्रवेश केल्यापासून शहराचा थोडा भाग बघितला होता, बाकी गेली अनेक वर्षे घर हेच तिचे विश्व होते. ती जात असल्याने बिपीनला काहीच फरक पडणार नव्हता, स्वारी तर एकदम खूशच झाली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. हा एक विलक्षण अनुभव तिच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी देणारा ठरणार होता.

पारो विमानतळावर सर्व भारतीय पाहुण्यांचे रीन्पो यांनी भूतानी पद्धतीचा लाल डगला { घो } घालून स्वागत केले. पुढील तीन दिवस विविध मॉनेस्स्टीरिज, थिंपू मधील विविध ऐतिहासिक स्थळे पारो म्युझियम, थिंपूचे जपानी वस्तू मार्केट, जंगल सफरी, छोटा माउंटन ट्रेक असा भरगच्च कार्यक्रम रीन्पोनी आखलेला होता. प्रवासात त्यांच्या मदतीला ही दोन्ही मुले तत्परतेने पर्यटकांच्या मदतीला जात होती. मौशुचे आकर्षक व्यक्तीमत्व लाघवी बोलणे अगदी सर्वजण तिच्यावर खुश होते. पारो जवळील Ta Zong museum दोन मजले वर आणि दोन मजले जमिनीखाली, भूतान देशाचा संपूर्ण इतिहास, कलाकृती पौराणिक कथेवरील कापडावर रंगवलेली चित्रे, विविध शस्त्रे, प्रत्येक दालनात उत्तम काचेची कपाटे मार्बलची फरशी, उत्कृष्ट विजेचे दिवे, सर्व माहोल पाहून पर्यटक भलतेच खुश झाले होते, भरपूर फिरावे लागल्याने व त्यातच हवेतील प्रचंड गारवा मौशु थकून एका बाकावर बसले होती, तिच्याच बाजूला मुंबईच्या पर्यटन कंपनीच्या प्रमुख असलेल्या दोन स्त्रिया तिच्या जवळ येऊन बसल्या. ”काय डोळ्याचे पारणे फिटणारे म्युझियम आहे, खरच हा देश म्हणजे स्वर्गभूमी आहे, असे आपापसात मराठीत बोलत होत्या,, क्षणात मौशुचे कान सुन्न झाले, चेहरा कावरा बावरा झाला, आज अनेक वर्षानी मधुर आवाजातील मराठी वाक्ये तिच्या कानावर पडत होती, तिच्या डोळ्यासमोर आई दिसू लागली, तिच्या गोड आवाजातील लहानपणी ऐकलेल्या परीकथांच्या स्मृतीत ती हरवून गेली, त्या दोघी तिला प्रेमाने इंग्रजीत आपल्याला आवडलेलं भूतान आणि त्याहून आवडलेले तुझे व्यक्तीमत्व त्या वाखाणित होत्या. आता त्यांची तिच्याशी छानच मैत्री झाली होती. त्या दोघीना प्रेमाबरोबर एक कुतहूल मौशु बद्दल वाटत होते, या मुलीची चेहरेपट्टी तिचे हसणे अगदी मराठी पद्धतीचे वाटत होते तिचे फोटो अनेक जागी त्या काढत होत्या. मौशूच्या कानावर मुंबईच्या गोष्टी ओघाने पडत होत्या, तिच्या मनाची चलबिचल होत होती, एका क्षणी तिला वाटू लागले होते की यांच्याशी आपल्या अभागी जीवनाची कथा उलगडावी का? पण क्षणात तिने मनाला लगाम घातला, अजून रीन्पोन्शी सुद्धा कसलाच उलगडा केलेला नव्हता. परत सगळे पर्यटक शेवटच्या सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याकरता बसमधून रवाना झाले आता मौशूला तर काय मुंबईच्या बायकांची सोबत होती. आज कळी प्रथमच उमलत होती.

भूतान मधील थिकसे मॉनेस्ट्रीच्या भव्य चौकात रंगीत मुखवटे घातलेले अनेक भूतानी पुरुष व स्त्रिया विविध पद्धतीचे नाच करणार होते. तगडे पुरुष ज्यांनी गुढग्या पर्यंत लाल लोकरीचे डगले घातलेले हातात धनुष्य बाण, भाले, साथीला प्रचंड आवाज करणारे ड्रम्स, तुताऱ्या, झांजा, प्रचंड जल्लोषात नाचांमागून नाच पेश केले जात होते. मौशु मुंबईच्या दोन्ही बायकांच्या मध्यातच बसली होती. शेवटचा सर्प राक्षसाचा नाच सुरु झाला, त्याचे काळोखातील आगमन, भीतीदायक संगीत, मौशुनी घाबरून दोघींचे हात घट्ट पकडले, दोघींनी तिला जवळ घेत प्रेमाची उब दिली, आपल्या अंगावरून आईचाच हात फिरत आहे अशा स्वप्नात ती मशगुल झाली होती.

कार्यक्रमाचा शेवट ड्रगनच्या वधाने होतो, आणि दुभंगलेली कुटुंबे जोडली जातात, अशा तऱ्हेने कार्यक्रमाची गोड सांगता झाली. मौशुलाही वाटू लागले, की माझ्याही जीवनात एक ड्रगन असून तो माझा सर्वनाश करत आहे, त्याचाही केव्हांतरी नाश होईल आणि मी माझ्या आईच्या गळ्यात पडेन का? मनातील चक्रे भन्नाट वेगाने फिरू लागली होती.

तोंगशे रीन्पोच्या ऑफीस मध्ये मुंबईच्या आलेल्या पाहुण्यांनी आपल्या शहराच्या प्रेक्षणीय स्थळांच्या सीडी, मुंबई टेलेफोन नंबर असलेली सीडी अनेक मोठाल्या कंपन्यांचे पत्ते अशा अनेक उपयुक्त गोष्टी भेट दिल्या होत्या. व्यापार, व पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने यांचा उपयोग होणार होता. यामधील एक सीडी मौशुमीच्या जीवनात प्रचंड मोठा झंझावात निर्माण करणार होती, नशीबाचे फासे वेगळेच पडणार होते.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..