नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २

दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्नाचा सोहळा आईच्या उपस्थीती विना पार पाडला आणी मिया बीबींचा संसार सुरु झाला, आईला मन घट्ट करत स्वताला सावरावेच लागले. बिपीन एकलकोंडा, हातात भरपूर पैसा,  मनमानी जीवन जगणारा, स्वताच्या हुशारीचा पराकोटीचा अभिमान, बोलण्यात फटकळ, मी म्हणेन तेच खरे,  अहंकारात डूबलेला, पण आंधळ्या प्रेमापुढे इतर सर्व गोष्टीना थाराच नसतो. संगीताच्या संसारात रोजचा दिवस नवीन सुखाने उजाडत होता.

संगीताला प्रमोशन मिळाल्याबद्दल तीने बॅंकेत एक छोटी पार्टी ठेवली होती,  ‘बिपीन आज सन्ध्याकाळी तू नक्की यायचे आहेस. संगीता नटून थटून गेली होती.  बिपीन ने  काहीतरी सुल्ल्क कारण पुढे करत गेलाच नव्हता. रात्री ११ वाजता हातात गुलाबाचा सुंदर गुच्छ इतकी आनंदात घरी आली,  पण गुर्मीतच त्याने दार उघडले, न बोलता सरळ बेडरूम मध्ये गेला,  संगीता लाडात त्याच्याशी बोलत होती, तिनेच पुधाक्र घेत त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, ’तुला आज माझे झालेले कौतुक ऐकून घ्यावेच लागेल हं असे म्हणत म्हणत तीने त्याचा मुकाही घेतला, पण थंड प्रतिसाद देत मिठीतून सुटका करून चक्क दुसऱ्या खोलीत झोपावयास गेला,  ‘तुझे प्रमोशन तुझ्या जवळच ठेव, अहंकाराचा दर्प उफाळलेला होता.

संगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती. विचारांच्या गुंत्यात पहाटेला डोळा लागला, उठण्यास उशीर झाला,  स्वताचा चहा करून स्वारी ऑफीसला निघून गेली होती. संगीताने आपल्या प्रेमळ समंजस वागण्याने राजा राणीचा संसार रुळावर आणला होता.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..