IC131 दिल्ली मुंबई विमान सांताक्रूझ विमानतळा वर उतरत होते. संगीता, आजी, व विजय स्वागत कक्षातून विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रयेक प्रवाशाकडे आतुरतेने पाहात होते. लाल खमीज निळी सलवार घातलेल्या तरुण मुलीच्या शोधात तिघांचे डोळे भिरभिरत होते. त्यांच्या चेहऱ्या वरील भीतीच्या छाया लपल्या जात नव्हत्या. तिला बाहेर पडण्यास जरा वेळ लागत होता. त्यांना प्रत्येक क्षण युगाप्रमाणे वाटत होता. आणी पुढे काही कळायच्या आत लाल खमीज घातलेली, निष्पाप, गोड चेहऱ्याची, बुजलेली मौशु दिसली, आणि संगीता तीरासारखी धावत सुटली, एक मिनिट दोघी समोरा समोर नि:स्तब्ध उभ्या होत्या. मौशुच्या मानेवरचा तीळ उठून दिसत होता, ती जन्म खुण संगीताच्या नजरेने पटकन हेरली, संगीताने मौशूला घट्ट मिठीत घेतले होते, अश्रुंना वाट मोकळी झाली होती, एका तपाच्या क्रूर काळावर कायमचा पडदा पडला होता.
बिपीन नुकताच घरी परतला होता. त्याच्या बेडरुम मधील पलंगावर भल्या मोठया ड्रगन चा नाश झाल्याचे चित्र पसरलेले होते, त्यावर एक चिट्ठी फडकत होती ”मौशुने स्वत:चाच जन्म घडवला आहे, आता माझ्या आणी आईच्या जीवनात कदापी शिरण्याचा प्रयत्नही करू नका, आगीत होरपळले लाल. – निर्दयपणे एका अभागी मुलीच्या जीवनाचा पालापाचोळा केलात, पण देव आमच्या पाठीशी आहे.
तोंग्शेच्या घरातील फोनची घंटा वाजत होती, मुबईतील एका घरात सोनेरी पहाट उजाडत होती. कुस्करलेली कळी उमलत होती.
———————————————————————————————–
अशा तऱ्हेची कथा कोणाच्या कुटुंबात घडली असेल तर तो निव्वळ योगायोग. जगात काहीही घडू शकते.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply