लग्नाला ६ महिने झाले होते, आएचे घर तर साफ तुटल्यासारखेच होते, बिपीनचा अहंकारी स्वभाव, आणी आईचा लग्नाला विरोध संगीताची चांगलीच कोंडी झालेली, पण कामच्या आनंदात ती बुडून गेली होती,
एके दिवशी ती ऑफिसात कामात मग्न असताना तिचा धाकटा भाऊ विजय रडवेल्या आवाजात हुंदके देत फोनवर बोलत होता ‘ताई आई तापाने फणफणलेली असून १०५ ताप असून ती असंबद्ध बडबडत असल्याने आपल्या डॉक्टरानी तीला धन्वन्तरी हॉस्पिटल मध्ये भरती केलेले आहे, रक्ताच्या तपासणीत मलेरियाचे निदान झालेले आहे, तू ताबडतोब ये. त्याच्या हुंदक्यांनी ती क्षणभर हादरूनच गेली. आयसीयु मधील आईची अवस्था पाहून संगीताला रडूच कोसळले. पूर्ण बेशुद्ध, अवस्था, नळ्यांचे जंजाळ, लघवीतून जाणारे रक्त सर केस गंभीर होती, २४ तास काहीच सांगता येणार नाही, असे स्पष्टपणे मोठया डॉक्टरानी सांगितले होते. संगीता देवस रात्र आईच्या उशाशी बसून होती. बिपीनला आईच्या गंभीर स्थितीची कल्पना देऊनही तो बघालाही गेला नव्हता, मुग गिळून गप्प बसण्या शिवाय टीच्या जवळ दुसरा मार्गच नव्हता. स्वभावाला औषध नाही. तिसऱ्या दिवसा पासून आईच्या तब्बेतीत सुधारणा दिसू लागली, धोका टळला होता, पूर्ण बरे होण्यास जवळ जवळ महिना लागला, ऑफीस, आईचे घर आणी बिपीनची धूसफूस संगीता कावून गेली होती. ७० हजाराच्या बिलाचा बोजा तिने उचलल्याने विजय व आई यांचा जीव भांड्यात पडला होता. संगीताने जीवापाड आईची सेवा केली होती. आणि हेच तर बिपीनचे शल्य होते. आईवरचे प्रेम पाहून त्याचे डोकेच फिरले होते, यामुळे माझे किती हाल होत आहेत हे वारंवार संगीताला बोलून दाखविण्यात त्याला असुरी आनंद मिळत होता.
आपल्या मनाविरुद्ध लग्नामुळे झालेल्या आईच्या मनातील कटूतेवर तात्पुरता तरी पडदा पडला होता. संगीताच्या घरी वादविवाद, भांडणे यांना उत आला होता. काही वेळा संगीताचाही संयम सुटत होता. संसाराची घडी काही सरळ मार्गाला लागत नव्हती.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply