कुसुमे कल्पनांची,
तुझ्या चरणी वाहिली,
शब्दांची मांदियाळी,
तुजसाठी मांडली,—!!!
अर्थपूर्ण रचनांचे,
हार तुज घातले,
रसिकांची पावती,
तुज चरणी अर्पियली,—!!!
प्रतिभा देवी तुला वंदिते,
दिनरात कशी मी,
वरदहस्त तुझा राहो,
इतुकी चरणी विनंती,—!!!
हात माझे “थोटेच” की,
तुझ्या “यथासांग” पूजेसाठी,
“चूकभूल’ घडता देवी ,
लेकरू” म्हणुनी पदरात घेई,—!!!
काव्याची सर्व बंधने,
दिली मी झुगारूनी,
भावली ती कविता,
प्रांजळ शब्दी मांडली,—!!!
प्रामाणिक भाव त्यात,
नाहीत शब्दांचे खेळ,
अंतरांना स्पर्श करणे,
एवढाच हेतू एक,—-!!!!
कृपास्पर्शे, तुझ्या,
होते मी धन्य,
चरणी लीन अशी,
भावनाही अनन्य,—!!!
तुझ्या कारणे,
हृदये जिंकली,
दाद देत कशी,
मने जवळ आली,—!!!
तुझिया प्रसन्नतेने,
कविता माझी झाली,
दुसरे काय मागावे ,
पुण्याई फळास आली,—!!!
भाषाई माझी थोर,
मस्तक तिच्यापुढे झुकवते,
माध्यमातून तिच्याच,
तुज काव्यकुसुमे वाहते,—!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply