कुठला ऋतू हा पर्ण निष्पर्ण पाचोळा आहे
तुझ्या बहरातला मोहर एकाकी जळत आहे
सांज ही एकाकी अनोळखी गूढ आहे
तुझ्या मार्गातली वाट ही कातर आहे
कितीक वाट पहावी निःशब्द मी आहे
ओढ तुझी अलगद मन वेढून आहे
कुठले बंध हे मज बांधून अबोध आहे
कुठले ऋणानुबंध तुझ्यात माझे जोडले आहे
का तुझा मोह मज मोहवून मुग्ध आहे
डोळ्यांतले अश्रू तुझ्यात का व्याकुळ आहे
सांग तू कसले हे नाते तुझे माझे आहे
आठवणीत तुझ्या मी आरक्त आहे
प्रेम म्हणू की ओढ म्हणू न कळे हे काय आहे
इतकेच माहीत तुझ्या ओढीत मी गुंतले आहे
हळवे ओल भाव हृदहस्थ मिटून आहे
तुझ्या वाटेवर नजर रोखून वाट तुझीच आहे
न कळला वेल्हाळ भाव तुला तू काठावर आहे
मन माझे दुधाळ चांदण्यासवे तुझ्यात अबोल आहे
कितीक वाट पाहता तुझी रात्रही आर्त आहे
सोसतो न हा वादळ वारा बंद डोळ्यांत तू आहे
थकले मन शिणल्या वाटा परी ओढ अजून आहे
तुझे माझे नाते हे गतजन्मीचे अपूर्ण ऋण आहे
चांद हा एकाकी आकाशी चांदण्या विखरुन आहे
तुझ्या मोहात मोह वेडी मी चांदण्यात मिटून आहे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply