कुठल्या वाटेवर या
पाऊल अलगद पडते
ही वाट कुठे हरवून
अनामिक मग होते..
फुलतील फुलांचे मळे
फुलपाखरे फुलात बागडे
गंधित मन होईल अलगद
सुवास अंतरी मोहक दाटे..
ही वाट अशी मग चालता
रमते क्षणभर मन हसरे बावरे
पाहूनी निसर्ग फुलतील गात्रे
नयनी साठविते हे फुलांचे ताटवे..
किती किती मन हरखून जाई
सुखद क्षण आनंद हृदयात भावे
मोहरुन जाईल अबोल काया
चुंबीता फुलास भुंगा कळी ती लाजे
हरवते या वाटेवर पाऊल माझे
किती रंगुन जाईल मनाचे धागे
उरतील पाऊलखुणा या वाटेवरती
ते धागे असतील धुंद रेशमी लडीचे..
फुलतील फुले मोहक सारे
फुलांचे गालिचे अलगद अंथरले
मन तृषांत अधिर आल्हाद ओथंबले
फुलात गंधाळून लाजले फुलपाखरे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply