आपली अर्थव्यवस्था स्थिरपदावर आणण्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रे कोणतीही कुटील कारस्थाने आणि षडयंत्र करण्यात पुढेच राहिली आहेत.विविध राष्ट्रांमध्ये अंतर्गत बंडाळी माजविणे, कुरापती काढणे त्यांच्यासाठी नाममात्र गोष्ट आहे.
लिबियातील अस्थिरता व स्फोटक परिस्थितीच्या आडून, अमेरिका व त्याच्या दोस्त राष्ट्रांनी लीबियावर हवाई हल्ले करण्यास सुरु केले. यात कोणतीही मानवियता नसून, आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजार पेठेवर नजर ठेवून केलेली कुटील नीती होय . इराक इराण संघर्ष हे तेलाच्या बाजारपेठेवर नजर ठेवून रचलेले षडयंत्र होते.
अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही. आतापर्यंतच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास, अमेरिकेच्या स्वार्थी राजकारणाचे हजारो उदाहरणे मिळतील. आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे अमेरिकेच्या कुटील राजकारणाचे व खुजेपानाचे पाप होय.
अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.
भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.तसेच हे न समजायला आम्ही वेडे नाही.
आशियायी राष्ट्रांनी आर्थिक उन्नतीमध्ये अग्रेसर व्हायचे असेल तर या पाश्चिमात्य राष्ट्रांना शह देणे आवश्यक आहे. लीबियावरील हल्ल्यांमुळे तेथील सरकारवर नियंत्रण मिळवून तेलाच्या खाणींवर ताबा मिळवणे सहज शक्य आहे,हे ओळखून ही कार्यवाही अवलंब
ली आहे. या प्रकारामुळे आशियायी राष्ट्रांना तेलाच्या भाववाढीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अमेरिका व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांवर दबाव वाढवून, दुसऱ्या राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करणे बंद पडले पाहिजे.
महाभारतातील कौरव पांडव यांचे वैर असतानाही, कौरवांना यक्षांनी बंदी केल्यावर ” वयं पंचाधीकम शतं ” अशी भूमिका घेऊन कौरवांची सुटका केली होती.
एकंदर पाश्चात्य राष्ट्रांची दंडुकेशाही व जागतिक
बाजारपेठेला वेठीस धरून आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याची प्रवृत्ती हाणून पडली पाहिजे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply