लहानपणी आम्ही रस्त्यावरची कुत्र्याची पिलं पाळायचो..
त्यांना राहायला खोक्याची घरं करायचो..
सक्काळ-संध्याकाळ चांगल्या, घरच्या पोळ्या दुध खाऊ-पिउ घालायचो..
आठवड्याला आंघोळ घालायचो..
फक्त बांधून मात्र घालायचो नाई..
आम्हाला वाटायचं ‘वा.. काय छान पाळलय आम्ही ह्यांना.. ही काई रस्त्यावरच्या ईतर कुत्र्यांसारखी नाईयेत’ वगैरे मजा असायची..
पण पुढं मोठी झाल्यावर मात्र हीच पिल्लं,आम्ही केलेल्या घरातून निघुन जात..त्यांच्याच इतर भाईबंदांना शोधुन त्यांच्याबरोबर गावभर फिरत उकीरडे चिवडत..
आम्हाला खुप वाईट वाटायचं तेव्हा..
नंतर मोठे झाल्यावर कळलं..
आपण काहीही करत नसतो..
जो तो आपली कुवत आणि गुणधर्म जन्माला येतानाच घेउन येतो..आपण एखाद्याला अगदी कितीही प्रेम, कितीही आदर व चांगली वागणुक दिली तरी त्याचे कान भरणारे कुणी आल्यावर तो आपल्या मुळच्या रंगात परत रंगून आपल्या जन्मजात लायकीच्या लोकांशीच संबंध जोडून घेत त्यांच्याच कळपातच फिरू बघतो..
(ही पोस्ट माझे मित्र श्री. नचिकेत परांजपे यांच्या फेबु वाॅलवरून घेतली आहे. या पोस्टचा सद्य राजकारणाशी किंवा राजकारणात असणाऱ्यांचा काही संबंध नाही.)
— नितीन साळुंखे
Leave a Reply