नवीन लेखन...

लालपरी – एस.टी.महामंडळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. MSRTC ला ST या प्रचलित नावानेही ओळखले जाते. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. सध्या हे नाव संपामुळे चर्चेत आहे. परंतु आपल्या पैकी बऱ्याच लोकांना एसटीचा इतिहास माहिती नाही. तर चला आज बघूया लालपरीचा इतिहास…
स्थापना आणि इतिहास
१९२० सालच्या सुमारास अनेक उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केली होती. त्यामुळे हेवेदावे आणि अनियंत्रित भाडेवाढ यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोटार वाहन अधिनियम (The Motar Vehicle Act) १९३९ अस्तित्वात आणला गेला. कायद्याने खाजगी वाहतूक व्यावसायिकांची संघटना तयार करण्यात आली. यामुळे समस्यांवर नियंत्रण आलेच पण प्रवाशांसाठी खूप सोयी निर्माण झाल्या. ठराविक थांबे, वेळापत्रक, निश्चित भाडे इत्यादी सुविधांमुळे प्रवास सुकर होऊ लागला.
यानंतर १९४८ साली, गृहमंत्री कै. श्री. मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. १९४७ साली भारत स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९४८ साली पहिली, चंदेरी छताची निळी बस पुणे ते अहमदनगर जिल्ह्यांदरम्यान धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या.
त्यानंतर १९५० मध्ये, मॉरिस कमर्शिअल कंपनीच्या, दोन आरामदायी सुविधा असणाऱ्या बसगाड्या चालवण्यात आल्या. त्या ‘नीलकमल’ आणि ‘गिर्यारोहिणी’ नावाने प्रसिद्ध होत्या. पुणे ते महाबळेश्वर मार्गावर या गाड्या धावत. ते दोन दोन आसनांच्या रांगा, पडदे, अंतर्गत सजावट, घड्याळ आणि हिरव्या रंगाच्या काचा असा या गाड्यांचा थाट होता. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.
३० लाकडी बॉडी असलेल्या बेडफर्ड बसेस घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. पुणे नगर रस्त्याची तिकीट ९ पैसे एवढी होती. कालांतराने महामंडळाने अनेक बदल करत एसटीच्या सुविधा वाढविल्या. लाकडी ऐवजी आता अल्युमिनियम बॉडीच्या बस आल्या. कुशन असलेल्या सीट वापरण्यात आल्या आणि १९५६ पासून रातराणी सेवा सुरु करण्यात आली. निळ्या रंगाच्या बस आता लाल झाल्या आहेत. १९८२ साली एशियन गेम सुरु असताना निम आराम बस सुरु करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर असे एसटीचे सहा विभाग आहेत.
आज ST कडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० वाहने आहेत. त्यामध्ये साध्या बसगाड्यांची संख्या १४०२२, शहर बसगाड्या ६५१, निम आराम बसगाड्या ५४४, मिनी बसगाड्या १९९, डिलक्स बसगाड्या ४८ आहेत. याशिवाय अधिकारी वर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामार्गाकडे आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी शिवशाही या बसेस दाखल झाल्या आहेत. या शिवशाही बसमध्ये ४७ आसन आहेत, लॅपटॉप मोबाईलची सोय, एलईडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. एकूण १५०० शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय.
सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

1 Comment on लालपरी – एस.टी.महामंडळ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..