एक चांदणी रोज बघे मी, क्षितीजावरती
चमचम चमके, मिश्कील हासे, लक्ष्य खेचून घेई
वाट बघे मी रोज रात्रीची, बघण्या तिजला
दिवसभराचा विरह तिचा, नाही सहन झाला
जवळी येउनी माझ्यासंगे, खेळ तू अंगणी
होकार दिला चटकन तिने, किंचित हास्य करुनी
नंतर मजला रोजच्या जागी, पुन्हा न ती दिसली
सहवासातील वियोगाचा, चटका लाऊन गेली
नजर पडता नातीवरी, चकित झालो एकाक्षणी
अंतरयामी जणीव झाली, हीच ती माझी चांदणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply