नवीन लेखन...

लक्षवेधी सूचना…

|| हरी ओम ||

काही दिवसांपूर्वी केंद्रात लोकसभा आणि राज्यसभेची आणि राज्यात विधानसभा आणि विधानपरिषदेचे अधिवेशन सुरु आहेत आणि आपल्या कानावर सतत काही शब्द येत होते ते म्हणजे तारांकित प्रश्न, लक्षवेधी ई.

कुठल्याही कार्यालयात मग ते सरकारी असो की खाजगी असो कामाच्या वेळात काम हे केलेच पाहिजे म्हणजे ज्याचा आपण काम करून मोबदला घेतो तो चोख आणि प्रामाणिकपणे करणे आपले कर्तव्य आहे. पण काही वेळा स्मार्टफोनमुळे कामात टंगळमंगळ केली जाते मोबाईल वरील मेसेज वाचण्यात आणि ते पुढे पाठविण्यात आणि च्याटींग करण्यात बराचसा वेळ फुकट जातो पण हे कर्मचार्यांच्या लक्षात येत नाही आणि जबाबदार वरिष्ठ अधिकार्यांना नाईलाजाने लक्षवेधी सुचनेसारखे नियम आस्थापनांत लागू करावे लागतात हा नियम कर्मचार्यांसकट जनतेसाठीही लागू होतो आणि मग दोघांचीही मने शासन, अस्थापन आणि अधिकार्यांप्रती दुषित होतात.

मंगळावर दिनांक ८ ऑगस्टपासून कार्यालयातील कर्मचार्यांना आणि जनतेला स्मार्ट फोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे अशी लक्षवेधी सूचना राजस्थानच्या उदयपूरमधील जलसंधारण विभागाच्या कार्यालयात जारी करण्यात आली आणि श्री. सिद्धार्थ नाईक यांनी दैनिक प्रत्यक्षमधील राष्ट्रगंगेच्या तीरावरून ही बातमी दिनांक ८ ऑगस्ट २०१७ला लक्षवेधी केली त्याबद्दल धन्यवाद.

या लक्षवेधीतून स्मार्टफोनचा गैर वापर करणार्यांना बरंच काही शिकण्यासारखं आहे. मुख्य म्हणजे आपल्यासाठी स्मार्टफोन आहे, स्मार्टफोनसाठी आपण नाही हे वाक्य अधोरेखित करण्यासारखे आहे. मोबाईचा उगम कसा झाला, कोणत्या कारणांसाठी आणि परिस्थितीत झाला हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे, तरीही आपल्यातील बऱ्याच जणांकडून त्याच्या गैरवापर होताना दिसतो, तरी हे टाळता आलं तर चांगलच आहे. असो.

मानवाच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञांनी मोलाची भूमिका बजावली आहे. माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विशेष फायदा झाला आहे. मोबाईल फोन हे त्यापैकीच एक संवादाचं आणि आर्थिक देवाण-घेवाणीच महत्वाचं साधन बनलं आहे.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर आपल्याकडून केला जातोय. आज हे साधन प्रत्येकाची गरज बनली आहे. मोबाईलमुळं सर्व विश्व आपल्या मुठीत आलं आहे. परंतू मानव संस्कृतीच्या इतिहासात डोकावल्यास माणसाने संवादासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केल्याच लक्षात येईल.

आपल्या संस्कृतीच्या उदयाला ५० हजार वर्ष उलटून गेली आहेत. सुरुवातीच्या काळात संवादासाठी मानवाने विविध प्रकारच्या आवाजाचा वापर केला. कालांतराने भाषा अस्तित्वात आली. संवादासाठी भाषेचा वापर सुरु झाला. मानवाने माध्यम म्हणून विविध प्राणी आणि पक्षांचा वापर केला. पुढं दूत अस्तित्वात आला आणि आधुनिक काळात त्याला पोस्टमन ही ओळख मिळाली.

पहिल्या महायुद्धात संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला. तर दुस-या महायुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला. त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता. १९४०च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली.

पुढची तीन दशकं यावर बरचं संशोधन झालं. आणि ग्राफिक्स इन-३ एप्रिल १९७३ ग्राफिक्स आऊटला पहिला मोबाईल फोन कॉल झाला. मोटोरोला कंपनीचे इंजीनिअर मार्टिन कुपर यांनी तो कॉल केला होता. तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता.

आज त्या घटनेला चवेचाळिस वर्ष पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल फोन आज स्मार्ट फोन बनला असून इंटरनेटपासून ते फोटोपर्यंत आणि व्हिडिओ कॉलिंग पासून ते मनोरंजनापर्यंत सगळं काही एकट्या मोबाईलमध्ये सामावलं आहे. त्यामुळेच मोबाईल फोन माणसाचा जीवलग बनला आहे.

मोबाईल फोन आज प्रत्येकाची गरज बनला आहे. कारण मोबाईलमुळे कोणाशी, कधीही आणि कुठेही सहज संपर्क साधू शकतो. त्यामुळे तो जगभर लोकप्रिय ठरला आहे. गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन पहायला मिळतो.

बदलत्या काळाबरोबर मोबाईल फोनही बदलला आणि आता तो स्मार्ट बनला आहे. संवाद साधण्याबरोबच इंटरनेट, फोटो, जीपीआरएस, व्हीडिओ कॉलिंग, मनोरंजन असं सगळं काही मोबाईल फोनमध्ये सामावलं आहे.

स्मार्ट फोनमध्ये आज अनेक अॅप्स उपलब्ध असून कॉम्प्यूटरपेक्षाही जास्त अॅप्स हे स्मार्ट फोनसाठी तयार आहेत आणि भविष्यात अजून खूप तयार करण्यात येतील. स्मार्टफोनवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती, कला, तंत्रज्ञान  अशा विविध क्षेत्रासाठी स्मार्टफोन महत्वाची भूमिका बजावणार आहे. स्मार्टफोनमुळे आवघं जग मुठीत आलं असून भविष्यात मानवाच्या विकासात त्याचं महत्व खूपच वाढणार आहे.

कधी काळी चैनीची वाटणारी वस्तू आता जीवनावश्यक बनलीय. स्मार्टफोन ही आता प्रत्येकांची गरज आणि अत्यावश्यक असं एक अविभाज्य अंग बनलं आहे. पण सदैव आपल्या हातात असणारा स्मार्टफोन हा सर्वात मोठा शत्रू बनू पाहत आहे. कदाचित आपला विश्वास बसणार नाही परंतू हा स्मार्टफोन आज सत्तरा पेक्षा जास्त कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळतोय असं आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडींवरून पाहण्यात येत आहे.

मोबाइल/स्मार्टफोन आला आणि जगात मोठी संपर्कक्रांती झाली. भारतात तर बघताबघता गरीब-श्रीमंत, मालक-कामगार, स्त्री-पुरुष सर्वांच्याच कानाला मोबाइल लागला कारण त्याचा उपयोगच तसा होता. पण कालांतराने या उपयुक्त मोबाइलचा दुरुपयोगही सुरू झाला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आवाजात त्यावरून बोलणे, अश्लील एसएमएस पाठविणे, वाहने चालविताना अपघात होण्याची तमा न बाळगता त्याचा वापर करणे वगैरे वगैरे. त्यामुळे मोबाइल जितका उपयुक्त ठरला, तितकाच उपद्रवी ठरला. तेव्हा मोबाइल कसा वापरावा, केव्हा वापरावा, त्यावर कसे बोलावे याबद्दलचे धडे देण्याची वेळ आली आहे.

सध्या आपण बघतो की स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे सेल्फि काढण्याच्या नादात कित्येक जणांचे जीव गेलेत. माहिती तंत्रज्ञानाची प्रगती होताना स्मार्ट फोनच्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीने अवघे जग आपल्या मुठीत आले. फेसबुक, ट्वीटर, व्होटसअप, टेलिग्राम, हिस्टाग्राम, हाईक सारख्या सोशल मिडीयाने स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता आजच्या तरुणाई सकट जुन्याजमान्यातील माणसांना झपाटून टाकले आहे. त्यात फेसबुक, व्होट्सअप आणि ट्वीटरच्या प्रेमात बरेच आहेत. यामुळे दोन अनोळखी व्यक्तीसुद्धा एकमेकांशी चांगल्याच संपर्कात येतात. स्मार्टफोन आणि इंटरनेट प्यॅकमुळे साऱ्या जगाशी संपर्कात राहता येतं. पण या आनंदात आपण कोठे आहोत, काय करतोय, ऑफिसमध्ये असल्यास कोणाशी, किती आणि कुठल्या विषयावर किती बोलतोय याचे भान राहत नाही हे वास्तव आहे. तरी आपण यातून धडा घेऊन आपल्यात सकारात्मक आणि मनापासून सुधारणा करण्याची सवय लावून घेऊ.

जगदीश पटवर्धन

 

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..