नवीन लेखन...

सुप्रसिद्ध बॉलीवुड मधील संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल

प्यारेलाल रामप्रसाद शर्मा उर्फ प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर उर्फ लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले. प्यारेलाल यांच्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखत. त्यांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली.

प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी समोर बसवले आणि नोटेशन कसे करायचे ते अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला, आणि ते तंत्र बऱ्या पैकी आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले. व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असे वडील सांगत. त्यांनी प्यारेलालांच्या हाती व्हायोलिन दिले, पण वाजवायला शिकवले ते सहा महिन्यांनी. पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिन वादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसे पकडायचे, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तिसर्याी चौथ्या बोटाने कसा धरायचा या सार्यां चे एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी प्यारेलालना व्हायोलिन वाजवायला शिकवले नाही.

प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम – मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल – नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणाले होते की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही. आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला.

१९४८ च्या “जिद्दी” पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. ‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणे कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एकच होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली.

लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केले होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली. संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू लक्ष्मीकांत-प्यारेलाल बद्दल विशेष आस्था होती. “दोस्ती” चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. १९६३ ते १९९८ या कालावधीत तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने दिले. सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून याच जोडीचे नाव चित्रपटसंगीताच्या इतिहासात नोंदलं गेलं आहे. त्या काळात लोकप्रियतेचा आणि गुणवत्तेचा निकष मानली जाणारी ‘बिनाका गीतमाला’ लोकप्रिय होती. पारसमणी या पहिल्याच चित्रपटातले ‘हसता हुवा नूरानी चेहरा’ हे गाणे ‘बिनाका’ मध्ये वाजलेले पहिले गाणे ठरले. त्यानंतर सलग १६ गाणी या मालिकेत गाजली. बिनाकाच्या वार्षिक उत्सवात तर ५० पैकी ३२ गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची होती. एकूण १७४ गाणी बिनाकामध्ये आली, हा एक विक्रम आहे. ‘पारसमणी’ (१९६३) या चित्रपटापासूनच्या त्यांची सुरु झालेली ‘संगीत वाटचाल या यशस्वी जोडीतील लक्ष्मीकांत यांचे २१ जून १९९८ रोजी निधन झाल्यानंतर प्यारेलाल यांनी आपला ‘संगीत प्रवास’ कमी केला., परंतु या जोडीचा ‘संगीत प्रभाव’ मात्र कायम आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेली गाणी

https://www.youtube.com/watch?v=ykiEKsr_kNc

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..