‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’ मा.लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. मा.लालन सारंग भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्तव त्याहीपेक्षा बरच गहिरं आहे. बंडखोरपणा त्यांच्या आयुष्यातही आहेत. काळाच्या पुढे जाणार्याय असंख्य भूमिका त्यांनी केल्या आणि त्यातून निर्माण होणारी वादळं अंगावर घेतली. मा.लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं.
लालन सारंग मूळच्या गोव्याच्या. पण त्यांचं जन्मापासूनचं आयुष्य मुंबईत गेलं. ‘पहिल्या वर्षी ‘ बावळट मुलगी ‘ म्हणून कमलाकर सारंग यांनी जिला हिणवलं त्याच लालन सारंग यांना कमलाकर सारंग यांनी पुढच्या वर्षी स्वत:च्या नाटकात रोल दिला. हे कसं झालं ? कमलाकर सारंग त्यांच्या प्रेमात पडले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘ त्यावेळेस तो माझा फक्त मित्र होता. पहिल्या नाटकानंतर आमची ओळख झाली, मग वेगवेगळ्या नाटकात काम करत असताना आमची ओळख वाढत गेली. कालांतरानं आम्ही एकाच संस्थेचं काम करू लागलो आणि आमची मैत्री झाली. त्यावेळेस प्रेमात वगैरे पडण्याचा संबंधच नव्हता कारण तो त्यावेळेस दुसर्याआ मुलीच्या प्रेमात होता. माझ्यासमोर तिच्याबरोबर फिरतही होता. पहिल्यापासूनच कमलाकरचं व्यक्तिमत्त्व जरासं वेगळं होतं. एक तर जनरल कोकणी माणसाप्रमाणे तो कुजकट बोलायचा. पण साहित्य नाटक याचं त्याला प्रचंड नॉलेज होतं. एक प्रकारचं औदार्य त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यामुळे मला तो आवडायला लागला, पण त्याला तसं काही विचारायचं धाडस मी कधीच केलं नाही. पुढे त्याच्या चार्टर बँकेच्या नाटकात जेव्हा मी केलं तेव्हा आमचं संभाषण जास्त वाढत गेलं. मग त्यानं मला लग्नासाठी विचारलं आणि मी हो म्हटलं. ‘ कमलाकर सारंगांविषयी बोलताना त्या म्हणतात. ‘ नवरा वगैरेपेक्षा कमलाकर माझा चांगला मित्र होता. त्यानं उठसूठ माझी स्तुती केली नाही, पण तो एवढंच म्हणायचा की लालन जी भूमिका करते, त्याच्यासारखीच ती दिसते. त्याच्या आयुष्याला स्थैर्य कदाचित माझ्यामुळे मिळालं असेल, पण त्याच्याबरोबर माझी वाढ होत गेली. ‘सखाराम बाईंडरच्या आधीही लालन सारंग यांनी सहा व्यावसायिक नाटकं केली होती. पण मा.लालन सारंग यांच्या आयुष्यातला माइल स्टोन रोल म्हणजे सखाराम बाईंडरमधली ‘ चंपा. ‘ या भूमिकेनं त्यांना नवी ओळख मिळवून दिली. ‘सखाराम बाईंडरमधले लालन सारंग यांचे सहकलाकार म्हणजे निळू फुले.
निळू फुलेंविषयी बोलताना त्या म्हणतात, ‘ निळू फुले हे सहकलाकार म्हणून फार चांगले होते. ते कुठेही ओव्हरपॉवर करायला जात नाहीत ते खूप साधे होते. सहकलाकार म्हणून त्यांचा कोणताही त्रास झाला नाही. अर्थात आपल्या समोरच्या माणसाच्या बोलण्याची पद्धत किंवा अभिनयाची तर्हाी याचा समोरच्या माणसावर फरक पडतोच. आमची केमिस्ट्री एवढी छान जमली होती की कोणत्याही कॅरेक्टरनं दुसर्या ला ओव्हरपावर केलं नाही. ‘सखाराम बाईंडर म्हणजे लालन सारंग यांच्या जीवनातलं एक वादळी पर्व. महाराष्ट्राच्या इतिहासात दुसर्यार कोणत्याही नाटकावरून इतके वाद झाले नाहीत. दुसर्या कोणत्याही नाटकासाठी इतकी मोठी लढाई झाली नाही. ‘एवढं वादळ झाल्यावरही कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शक म्हणून किंवा लालन सारंग यांनी अभिनेत्री म्हणून हे नाटक बंद पडू दिलं नाही. बाईंडर नाटकाच्या वादामुळे कमलाकर सारंग यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे घरात पैशाची चणचण. ‘सखाराम बाईंडरवरून झालेल्या वादाचा त्रास मा.लालन सारंग यांच्या सगळ्या कुटुंबियांना भोगावा लागला. गुजराती, मराठी आणि हिंदी या तिन्ही रंगभूमीवर काम केल्यावरही मराठी रंगभूमी ही लालन सारंग यांची सर्वात आवडती रंगभूमी आहे. नाटक हे लालनताईंचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. सध्याच्या नाट्यव्यवसायाविषयी लालनताई फारशा समाधानी नाहीत. चांगली नाटकं येतच नाहीत, असं मत त्यांचे आहे. समांतर आणि बालरंगभूमीला द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही, म्हणूनच त्याविषयी नाट्यसंमेलनाध्यक्ष असताना आवाज उठवला.
लालन सारंग या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाही होत्या. अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणार्याल लालन सारंग या उत्तम गृहिणीही आहेत. त्या उत्तम स्वयंपाक करतात. पाककलांवर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. मधल्या काळात त्यांनी बुटिकही काढलं. विविधांगी भूमिका केल्याचं समाधान जगण्याला नक्कीच बळ देतयं. पैशांपेक्षा आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळून रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाटच आम्हाला प्रोत्साहन देणारा ठरत होता. आता लालनजी दोन-तीन वर्षांपासून आराम करतात. मात्र, सध्या व्यवसायिकाच्या भूमिकेत आहे त्या आनंद घेतात, स्वयंपाक व विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याची त्यांना आवड आहे. पुण्यात ‘मासेमारी’ हे हॉटेल उघडल आहे. त्या उत्तम वाचक आहेत आणि शिवाय त्यांचं लेखनही चालू आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply