लालबागचा राजा मंडळाच्या अब्जावधी रुपयांच्या कथित
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश
नवसाला पावतो’ अशी खोटी माहिती
देऊन केली लाखो भाविकांची फसवणूक
*राज्यपालांच्या निर्देशानंतर लालबागचा राजा मंडळाची अखेर चौकशी सुरू
*धर्मादाय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे विधी खात्याचे निर्देश
*दानपेट्या व सुवर्णालंकार ताब्यात घेण्याची केली मागणी
*साळवी यांची ‘ईडी’मार्फतही चौकशीची मागणी
कर्नाळा : उन्मेष गुजराथी
twitter.com/unmeshgujarathi
नामांकित प्रसारमाध्यमांशी ‘अर्थपूर्ण संबंध जोपासून’ नवसाला पावणारा लालबागचा राजा, अशी वारंवार चक्क खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन लाखो भाविकांना गंडा घालणार्या मंडळाची त्वरीत चौकशी करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.
मंडळाचे तब्बल सलग 16 वर्षे मानद सचिवपद सुधीर साळवीकडे आहे. त्यांच्याकडे अलिशान गाड्या, फ्लॅट्स, फॉर्म हाऊसेस, रोकड रक्कम अशा जवळपास अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आहे. याची त्वरीत चौकशी करण्याची मागणीही ‘इडी’कडे करण्यात आली आहे.
मंडळाचा कथित भ्रष्ट कारभार वेंगुर्लेकरांनी उघडकीस आणला. त्यांच्या तक्रारीची दखल राज्यपालांनी घेतली व त्याचे पत्र 31 ऑगस्ट 2015 रोजी विधी व न्याय विभागाकडे पाठवले होते. त्यानंतर या खात्याने धर्मादाय आयुक्तांना चौकशी अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तब्बल एक वर्षांनी ‘देर आये पर दुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणे आयुक्तांनी अखेर वेंगुर्लेकरांचा जबाब 29 ऑगस्ट 2016 रोजी नोंदवून घेतला. त्यानंतर मंडळाच्या चौकशीसंबंधीची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली.
सुधीर साळवी व त्रांच्रा कार्रकारणीतील सर्वांनी अब्जावधी रुपरांची मारा जमविली असून, त्यांची पदावरून त्वरीत हकालपट्टी करण्रात रावी अशी रोखठोख मागणी वेंगुर्लेकरांनी केली आहे.
राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी वेंगुर्लेकरांचा 29 ऑगस्ट 2016 रोजी जबाब नोंदवून घेतला. त्यातही वेंगुर्लेकरांनी त्यांच्या मूळ तक्रारीतील 19 मुद्यांचा सामावेश केला. हा जबाब शपथपत्रावर घेण्यात आला. त्यात त्यांनी सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवातही आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या दानपेट्या आणि अर्पण करण्यात येणारे सुवर्णालंकार ताब्यात घ्यावे, अशीही मागणी केली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी आता मंडळाची चौकशी या 19 मुद्यांच्या आधारे सुरू केली आहे.
काळे धन मिळवण्यासाठी मंडळाने केला घुबडाचा वापर
* यंदाच्या वर्षी मंडळाने गणपतीच्या मूर्तीमागे घुबडाची प्रतिकृती साकारली आहे. घुबड अपशकुनी असल्याने मंडळाच्या पदाधिकार्यांना आता गणेशभक्तांच्या प्रचंड जनक्षोला सामोरे जावे लागत आहे. तरीही मंडळाच्या पदाधिकार्यांनी या लोकभावनेला काडीची किंमत दिली नाही. मंडळाच्या पदाधिकार्यांनी घुबड अपशकुनी असते हा गैरसमज असून ते लक्ष्मीचे वाहन आहे, असा अजब युक्तीवाद केला आहे.
* धर्मशास्त्रातील अधिकारी व्यक्तींनी मात्र हा दावा खोडला आहे. मुळामध्ये मंडळाच्या पदाधिकार्यांनी हा खोडसाळपणा केला आहे, असेच त्यांचे मत आहे. श्रीगणेश ही शुद्ध सात्विक आणि बुद्धीची देवता आहे. त्याचे वाहन मूषक आहे. जर मंडळाच्या पदाधिकार्यांचा घुबड लक्ष्मीचे वाहन असल्याचा दावा असेल, तर हे वाहन श्रीगणेशाच्या मूर्तीमागे असणेच चुकीचे आहे. मुळात लक्ष्मी ही चंचल आणि माया समजली जाते. तिचा संबंध श्रीगणेशाशी लावणे हा देवतेचा अवमान आहेच, त्याचबरोबर त्या मूर्तीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या चुकीच्या लहरींनी लाखो गणेशभक्तांचे नुकसानच होणार आहे.
* घुबडाच्या प्रतिकृती विचित्र आणि भयावह आहे, हे शेंबडे पोरही सांगते. स्पंदनशास्त्रानुसार अयोग्य स्पंदनांमुळे वातावरणातील सात्विकता लोप पावते. मंडळाला सजावटीसाठी अन्य पर्यायही उपयोगात आणता आले असते, मात्र मंडळाने हा विचित्र पर्याय निवडला आहे.
* तांत्रिक विद्येमध्ये घुबडाला महत्त्व आहे. अघोरी विद्येच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडला जातो, त्यासाठी घुबडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशाच प्रकारे काळेधन मिळवण्यासाठी मंडळाने घुबडाचा वापर केला असावा, असा आरोप वेंगुर्लेकर यांनी केला आहे.
गणेशभक्तांच्या पैशाची अशी होतेय उधळपट्टी!
* मंडळाकडून रोषणाई व मंडपासाठी निविदा काढल्या जातात. त्या निविदा खोट्या असतात; कारण एकाच ठेकेदाराला हे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले जाते.
* मंडळ महापालिकेकडून 25 टक्के परवानगी घेते व 100 टक्के बांधकाम करते. रस्त्यावर
येण्या-जाण्यासाठी मंडपाचा अडथळा येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहे, मात्र हे मंडप सर्रास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करते. शासन याकडे दुर्लक्ष करते, एकाच मंडळाचे एवढे लाड का पुरवले जातात?
* रुग्ण सहाय्यनिधीतून मंडळाच्या पदाधिकार्यांना व रहिवाशांना 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते, मात्र जे गणेशभक्त मंडळाच्या दानपेट्या भरतात, त्यांना मात्र 5 ते 25 हजार रुपये दिले जातात, याचीही चौकशी शासनाने करावी.
* मंडळाचे महाराष्ट्र बँक, महानगर को-ऑप. बँक, एचडीएफसी या तीन बँकेत खाते आहे. या सर्व बँकांमधील मंडळाच्या मागील 10 वर्षांचा लेखाजोखा तपासावा, त्याची चौकशी करावी.
* मंडळाची स्थानिक रहिवाशांची मिळून 34 हजार रुपये वर्गणी जमते; मात्र बक्षीस समारंभात रहिवाशांसाठी 40 लाख ते 50 लाख रुपये खर्च केला जातो, याचीही चौकशी करावी.
* मंडळाच्या विरोधात जो आवाज उठवतो, त्याच्याविरोधात मानहानी, अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जातो. त्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाते. त्याकरता जनतेचे लाखो रुपये उधळले जातात. त्याची धर्मादाय कार्यालयाकडून परवानगी घेतली जात नाही.
‘त्या’ 19 मुद्यांवर धर्मादाय आयुक्त करणार मंडळाची चौकशी
* लालबागचा राजा मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा.
* सुधीर साळवी गेली 16 वर्षे मानद सचिव या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.
* सर्व खर्च करण्याचे (1 ते 50 कोटी खर्च) अधिकार साळवी यांना कोणत्या प्रशासनाने दिले?
* लालबागचा राजा मंडळामध्ये ज्यांनी पद भुषविले आहे. या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या दागदागिन्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच संपत्तीची चौकशी करण्यात यावी.
* लालबागचा राजा गणेशोत्सवादरम्यान स्थानिक रहिवाशांना ओळखपत्र दिले जाते. यापूर्वी पाकीटमार, साखळी चोर, मोबाईल चोर पोलिसांनी पकडले. यावर काळाचौकी पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंद केला नाही. मंडळाच्या ओळखपत्राचा दुरुपयोग अतिरेकीदेखील करू शकतात. याबाबत मंडळाचे सचिव यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घ्यावा.
* मंडळाची सन 2011 मध्ये विसर्जन संपल्यानंतर दानपेटी चोरीला गेली होती. त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. तसेच स्थानिक पोलीसांनी त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. दानपेटी चोरीला गेल्यासंदर्भात मंडळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासावेत. तसेच या खालील संशयित लोकांची चौकशी करावी.
* अशोक पवार (बी विंग, लालबाग राजा सोसायटी)
* संजय धुमक (जी विंग, लालबाग राजा सोसायटी)
* सुगत पेडेंलकर (एफ विंग, लालबाग राजा सोसायटी)
* राजेंद्र हळदणकर (58 टेनामेंट, पेरू कंपाऊंड)
* लालबागचा राजा मंडळाकडून घेण्यात येणार्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती शपथपत्र किंवा करारनामावर घेतल्या जात नाही, याची चौकशी करावी.
* मंडळाकडून दिला जाणारा रुग्ण सहाय्यनिधी याचे लेखी रेकॉर्ड ठेवलेले नाही. या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत कसून चौकशी करावी, तसेच स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजनेमध्येही अशाच प्रकारचा कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत देखील मंडळाचीे चौकशी करावी.
* मंडळाकडून करण्यात येणारी अरेरावी व दादागिरी यास आळा घालावा. याबाबत मंडळाकडून शपथपत्र घ्यावे.
* लालबागच्या राजास जे भाविक सोन्या चांदीचे अलंकार दान करतात त्याचे वजन व संख्या याची माहिती जाहीर करावी.
* मंडळाकडून किती खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात व त्यावर किती खर्च केला जातो, याची माहिती घेण्यात यावी. तसेच खासगी सुरक्षारक्षकांचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक अशी माहिती स्थानिक पोलिसांकडे मंडळाने दिली पाहिजे.
* मंडळाकडून देण्यात येणार्या ओळखपत्रांची यादी गांभीर्याने पोलीस ठाण्याकडे असावी.
* लोकसत्ता गेट, मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. तेथे मंडळाचे कार्यकर्ते पैसे घेऊन भाविकांना दर्शनासाठी गैरमार्गाने सोडतात. असा प्रकार घडू नये, म्हणून या ठिकाणी योग्य ते अधिकारी व अंमलदार नेमून गैरप्रकारे दर्शन होणार नाही. याची दक्षता घ्यावी. या गेटच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मंडळाचे ओळखपत्र लावून अतिरेकी प्रवेश मिळवून घातपात घडवू शकतात, असा प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी.
मंडळाकडूनच धोका
लालबागचा राजा मंडळाकडून आपल्या जिवाला धोका आहे; म्हणून वेंगुर्लेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस कमिशनर यांच्याकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली. त्यावर काळाचौकी पोलीसांनी 27 ऑगस्ट रोजी वेंगुर्लेकरांना बोलावून घेतले. तेथे पोलीस निरीक्षकांनी ‘तुम्ही मंडळाच्या विरोधात तक्रारी करणे बंद करा, अन्यथा तुम्हाला कलम 151 (3) नुसार अटक करू’, अशी थेट धमकीच दिली. पोलिसांचे हे कृत्य लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे, याविरोधात त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
फंडे मार्केटींगचे
* कधी ‘राजा’चे ‘मुखदर्शन’, ‘पायाचे दर्शन’, तर कधी ‘पहिले दर्शन’ अशा विविध मार्केटिंगच्या युक्त्या मंडळाने वापरल्या. या युक्त्यांच्या प्रसिद्धीसाठी मिडीयातील मंडळींना भरमसाठ पैसे देण्यात आले. ‘लालबागचा राजा नवसाला पावतो’ अशी चक्क खोटी माहिती मंडळाच्या पदाधिकार्यांनी मिडियाला दिली. त्यासाठी रिपोर्टरपासून ते थेट संपादक-मालकांनाही मॅनेज करण्यात आले. हे सर्व मॅनेज करताना थेट ‘पेड न्यूज’चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला, असा आरोप वेंगुर्लेकर यांनी केला आहे. त्याचा योग्य हिशोब अद्यापही देण्यात आलेला नाही.
* ‘लालबागचा राजा’ ‘नवसाला कसा पावतो’ अशा चक्क खोट्या केस स्टडीज तयार करून त्या सोशल मिडीया, प्रसारमाध्यमांतून दाखवण्यात आल्या. ‘जेवढी मंडळाची प्रसिद्धी अधिक; तेवढा ‘गल्ला’ अधिक’, हे मार्केटिंगचे साधे सोपे सूत्र येथे वापरण्यात आले. अर्थात यासाठी प्रसारमाध्यमांना लाखो रुपयांचे पॅकेजेस देण्यात आली.
* आजमितीस मुंबापुरीत 11 हजार 856 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असताना, केवळ लालबागच्या राजालाच प्रतिष्ठीत मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रथम पानावरच का पसंती दिली जाते, यामागे प्रचंड ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
* मराठी, हिंदीतील नामांकीत चॅनेल्सवर ‘राजा’चे लाईव्ह दर्शन दाखवले आहे व त्यावर ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ अशी चक्क खोटी जाहिरात बातमीस्वरूपात दाखवण्यात येते. यासाठी या चॅनेल्सना लाखो रुपये देण्यात येतात. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ विकला गेल्याचेही यावरून दिसून येते.
* मिडीयाला मोठ्या प्रमाणात पॅकेज दिल्यामुळे दर्शनाच्या नावाखाली राजकीय पुढारी व सेलेब्रिटीही येत असतात. सेलेब्रिटी असतात म्हणून मिडीयाही येतो. हे सर्व दृष्टचक्र थांबायला हवे.
* मंडळातील अब्जावधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी रान उठवणार्या समाजसेवक महेश वेंगुर्लेकर व पत्रकार उन्मेष गुजराथी यांच्यावर 10 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यात आला. हा दावा ठोकण्यासाठी मोठ्या वकिलांची फौज तैनात करण्यात आली. या वकिलांना द्यावी लागणारी भरमसाठ रक्कम ही भाविकांच्या खिशातूनच घेण्यात आली. या गलेलठ्ठ पैशाची वकिलांवर उधळण करण्याकरता धर्मादाय आयुक्तांची परवानगीही घेण्यात आली नाही, असे आरटीआयच्या कागदपत्रांतून उघडकीस आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी मंडळाचे सचिव साळवी यांना संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल न उचलणे पसंत केले.
पदाधिकार्यांनी दिल्या होत्या धमक्या
* प्रसारमाध्यमांना ‘पेड न्यूज’ देऊन मंडळाचे मोठ्या प्रमाणावर मार्केटींग करणार्या मंडळाच्या पदाधिकार्यांचे भ्रष्ट कारनामे ज्येष्ठ समाजसेवक महेश वेंगुर्लेकर यांनी उघडकीस आणले. इतकेच नव्हे, तर मंडळाचे पदाधिकारी व मग्रूर कार्यकर्ते यांच्या कारनाम्यांची माहितीही आरटीआयमधून वेंगुर्लेकर यांनी उघडकीस आणली. त्यामुळे धास्तावलेल्या पदाधिकार्यांनी त्यांंना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या, तशा तक्रारीही त्यांनी पोलिसांकडे केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी:
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/946049492121059/?type=3&theater
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/943738805685461/?type=3&theater
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/953252414734100/?type=3&theater
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/956548571071151/?type=3&theater
Unmesh Gujarathi
Mobile-09322 755 098
www.unmeshgujarathi.com
twitter.com/unmeshgujarathi
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/
Leave a Reply