भारतातील वैद्यकीय प्रवेशासाठी म्हणजे मेडिकलसाठी प्रवेशाकरीता नीट (NEET) नावाची परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेत उत्तराची भाषा म्हणून इंग्लिश आणि मराठी यातील एका भाषेची निवड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना करता येते.
उत्तराची भाषा म्हणून इंग्लिश निवडल्यास फक्त इंग्लिशमधली प्रश्नपत्रिका मिळते.
उत्तराची भाषा म्हणून मराठी निवडल्यास दोन भाषेतील प्रश्नपत्रिका मिळते. हा अधिकचा लाभ मिळवण्याची चलाखी महाराष्ट्रातील प्रत्येक चलाख व हुशार विद्यार्थ्याने करावी असे मी सुचवतो !
उत्तराची भाषा म्हणून मराठी निवडल्यावर मिळणाऱ्या प्रश्नपत्रिकेत डाव्या बाजूला इंग्लिश प्रश्न तर उजव्या बाजूला मराठी प्रश्न असतात. डाव्या बाजूच्या इंग्लिश प्रश्नाचेच भाषांतर म्हणजे उजवीकडचा मराठी प्रश्न असतो.
दोन्ही भाषेतील प्रश्नांचा आशय एकच असतो. विचारलेला प्रश्न एकाच वेळी दोन्ही भाषेतून वाचता आला तर त्यातील खोच किंवा बारकावा लवकर आणि नेमका कळतो.
प्रश्नातील बारकावा किंवा प्रश्नातील खोच नेमकी कळल्याने अधिक अचूक उत्तर लिहिता येते.
ज्याची अधिक अचूक उत्तरे असतील अशा विद्यार्थ्यांना अर्थातच अधिक गुण मिळतात.
इंग्रजी आणि मराठी दोन्ही प्रश्नपत्रिका एकत्र वाचून प्रश्न अचूक सोडवण्यासाठी एकदा मराठीतून उजळणी करायला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषयांची मराठीतील पाठ्यपुस्तके देखील उपलब्ध आहेत.
या परीक्षेसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तीन विषयांचा अभ्यास करावा लागतो या तीनही विषयांची इंग्रजी आणि मराठी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत.
नीट परीक्षेसाठी या तीन विषयांचा अभ्यास मराठी व इंग्लिश दोन्ही भाषांमधून केला तर मोठे यश मिळते.
नीट परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत सध्या सुरू आहे ! नीट परीक्षा देत असणाऱ्या प्रत्येकाने जरी ते सध्या इंग्लिशमधून शिकत असले तरी अर्ज भरताना त्या अर्जात उत्तराची भाषा म्हणून मराठीचा अवश्य उल्लेख करावा ! मराठीची निवड उत्तर भाषा म्हणून अवश्य करावी.
रोहन बहिर या विद्यार्थ्याने अशी निवड २०१६ ला केली होती. त्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेतील प्रश्नपत्रिका मिळाली. प्रत्येक प्रश्न अधिक चांगले केले म्हणून उत्तरे अधिक अचूक आली. त्याला ७२० पैकी ६२१ गुण नीटच्या परीक्षेत मिळाले आहेत.
२०१७ साली झालेल्या नीट परीक्षेत ११७९ विद्यार्थ्यांनी मराठी ही उत्तराची भाषा निवडली होती आणि हे सर्व विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये इंग्लिश मधूनच फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय शिकलेले होते.
इंग्लिश मधून शिकले असतानादेखील उत्तरे मराठीतून देण्याचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना दोन भाषेतील प्रश्न एकाच वेळी समोर आले. याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर होऊन त्यांना अपेक्षेपेक्षा खूप अधिक गुण नीटच्या परीक्षेत मिळाले होते.
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन !
मराठीची नांदी !
यशाची चांदी !!
हा संदेश ज्याच्यापर्यंत पोहोचेल त्याने आपल्या परिचयातील प्रत्येक बारावी सायन्सच्या विद्यार्थ्याला यातील सर्व माहिती पोचवावी, असे विनम्र आवाहन !
– प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)
अधिक माहितीसाठी संपर्क
९४२२००१६७१
Leave a Reply