लाटांवर लाटा उसळत,
तयार होते भिंत,
अगणित थेंबांच्या रेषा,
अशा, कोसळती अविरत,
थ
सोनसळीप्रकाश त्यावरी त्यांच्यावरी बघा खेळतो,
जलथेंबांचे अखंड नाच,
पाहुनी तो चमचमतो,
खालवर जाऊन पाण्यात,
जादूगार तो किमयाकरे
रंग सोनेरी हिरवे निळे,
जांभळे पांढरे त्यात पसरे,
लाटांची खळबळ ऐकून,
हसे तटस्थ तो किनारा,
चलबिचल”त्यांचीपाहत राही
विस्तीर्ण दूरवर पसरलेला,-!
लाटांचे चढउतार चालू,
एक दुसरीवरी उसळे,
प्रत्येकीचे प्रताप” वेगळे,
सामर्थ्यबघता ते निराळे,
भरती ओहोटी असो वा,
रुद्रतांडव रत्नाकराचे,
लाटांवाचून अस्तित्व” नाही, किती या विशाल सागराचे,!
थेंबाथेंबांचे अस्थिरहोणे,
खालवर वरखाली पुढेमागे,
लाट होऊनी काय दर्शवे,
जगणे आपुले तसेअसावे,!
थेंबाथेंबाने जीवन चाले पुढे,
खाली– वरती पुढेमागे,
असे असूनही परस्परांशी,
जोडायचे ना प्रेमधागे,–?
असंख्य जलबिंदू दाखवती, जीवनातील भंगुरता
चंचल स्वरूप हे यांचे ,
अन् टोकाचीअस्थिरता,–!
थेंबाना किनारा गाठणे,
कितीअप्राप्यवाटते, कधीतरी या यात्रेला,पण, मुक्तीही दैवीचअसते,–!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply