‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा–वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
विभाग – ४
कांहीं निरीक्षणें :
- यावरून एक महत्वाची बाब स्पष्ट होते. ती अशी की, ज्याप्रमाणें, desired audience ( जसें की, सुशिक्षित, अशिक्षित,अल्पशिक्षित ; पुरुष, स्त्रिया ; वृद्ध ,बाल इ. ) ; रचनेचा वर्ण्यविषय ( जसें की राम, श्रीकृष्णलीला, गीता, निर्गुण-सगुण ब्रह्म, परंपरेविरुद्धच्या-समाजसुधारणा, इ.), presentation– style (उदा. – कबीराच्या अध्यात्मिक रचनांची स्टाइल्, आणि त्यानें परंपरावर फटके मारले आहेत त्या दोह्यांची स्टाइल् , या दोन्ही भिन्नभिन्न स्टाइल्स् आहेत) ; निवेदनपद्धती ( जसें की, निरूपण, भाष्य / टीका, आख्यान, पठण, भजन, कीर्तन, गायन, इ. ) ; तसेंच, ‘वाचकानें/पाठकानें शब्दांचा सरळसरळ वाच्यार्थ घ्यावा की लक्ष्यार्थ घ्यावा यापैकी रचनाकाराला काय अभिप्रेत आहे ; त्याचप्रमाणें, वाचकानें/पाठकानें रचनेत ओपनली व्यक्त केलेला अर्थ घ्यावा की अव्यक्त ( reading between the lines)’ याबद्दल रचनाकाराची काय अपेक्षा आहे ; या व अशा बर्याच गोष्टींवर रचनेची भाषा अवलंबून असते. तसेंच, रचनेसाठी काय काव्यप्रकार निवडला आहे (जसें की, भारूड, अभंग, ओवी, पद, दोहा, साखी, सबद, ग़ज़ल, इ.), यावरही रचनेची भाषा अवलंबून असते.
*(गायनपद्धत व भाषा हें आणखी एक detailing होईल, व त्याबद्दल आपण नंतर बोलूं).
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M – 9869002126 .
eMail : vistainfin@yahoo.co.in
– – –
LATTERATEUR DNYANESHWAR AND LINGUAL-VARIETY-Part – 4