आश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात.
‘हे लक्ष्मी देवी, तू सर्व देवांना वर देणारी व विष्णूंना प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्ती होते ती तुझ्या दर्शनाने मला प्रास होवो.’
लक्ष्मीजवळ कुबेराची पूजा केली जाते. त्याची प्रार्थना – निधी व पद्य यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला माझा नमस्कार असो, आपल्या कृपेने धनधान्यादि संपत्ती प्रास होवो.
मध्यरात्रीनंतर अलक्ष्मीला हाकलविण्यासाठी सुपे व दिमडी वाजवितात.
पुराणांत असे सांगितले आहे – या दिवशी रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व निवासासाठी योग्य स्थानाचा
शोध घेते. जेथे स्वच्छता शोभा, रसिकता, चरित्र्यवान माणसे, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, क्षमाशील माणसे असतात तेथे ती वास्तव्य करते.
काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply