नवीन लेखन...

एलसीडी टीव्ही

एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात. मोठ्या आकारातही हे टीव्ही उपलब्ध असतात.

२००७ मध्ये कॅथोड रे ट्यूब टीव्ही पेक्षा एलसीडी टीव्हींचा खप जास्त झाला. सध्या याच एलसीडी टीव्हींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. एलसीडी टीव्हीच्या डिस्प्लेचा शोध मे १९६८ मध्ये विद्युत अभियंता जॉर्ज हेलमियर यांनी लावला. १९८१ मध्ये पहिला एलसीडी टीव्ही शार्प कंपनीने विकला, त्याचा आकार मात्र लहान म्हणजे चौदा इंचांचा होता. आपल्याला भौतिकशास्त्रात पदार्थाच्या घन, द्रव आणि वायू या तीन अवस्था शिकवल्या आहेत.

लिक्विड क्रिस्टल हा शब्दच चमत्कारिक आहे म्हणजे एकच असा पदार्थ जो द्रव आणि घन अशा स्वरूपात असतो हे आपल्याला अवघड वाटेल पण तसा गुणधर्म असलेले लिक्विड क्रिस्टल्स आहेत. ते घन स्थितीपेक्षा द्रव स्थितीकडे जास्त झुकलेले असतात. लिक्विड क्रिस्टल हे सिलिंड्रिकल असतात, त्यातून प्रकाश आरपार जातो.

लिक्विड क्रिस्टल तपमानाला अधिक संवेदनशील असतात. एलसीडी टीव्हीमध्ये थिन फिल्म ट्रान्झिस्टर तंत्रज्ञान वापरलेले असते. लिक्विड क्रिस्टलचे रेणू जेव्हा विद्युत क्षेत्राच्या संपर्कात येतात, तेव्हा विद्युत प्रवाहाच्या पातळीवर त्यातून किती प्रकाश जाणार हे अवलंबून असते, त्यामुळे एलसीडी टीव्हीमध्ये पांढऱ्या प्रकाशाला गाळून प्रतिमांची निर्मिती होत असते. यात कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लॅम्प हे पडद्याच्या मागे असतात.

लिक्विड क्रिस्टल हे दोन पोलरायझिंग फ्लिटसंच्या मध्ये बसवलेले असतात. दोन इलेक्ट्रोड विद्युत्प्रवाहाचे नियंत्रण करीत असतात. एलसीडी पडद्याच्या पुढच्या पॅनलवर वायरींचे जाळे असते. त्यातील प्रत्येक वायर ही रंगबिंदूशी जोडलेली असते. उजळ प्रतिमेसाठी कमी व्होल्टेज वापरले जाते तर गडद चित्रांसाठी जास्त व्होल्टेज लागते.

एलसीडी टीव्हीकडे जर नीट बघितले तर त्यात आपल्याला लक्षावधी छोटे रंगबिंदु दिसतात. लाल, निळा किंवा हिरवा असे रंग त्यात असतात, त्यांचे चालू-बंद असे नियंत्रण केले जाते. एलसीडी टीव्हीत रंगबिंदूंचे नियंत्रण लिक्विड क्रिस्टल्सनी केले जाते. या क्रिस्टल्सचा शोध ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिच रेनीटझर यांनी १८८८ मध्ये लावला होता पण त्यांचा एवढा मोठा उपयोग किती उशिरा कळला. एलसीडी टीव्हीमध्ये वीज कमी लागते व चित्रही स्पष्ट दिसते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..