आज लीप दिवस. आजचा दिवस वर्षातील उर्वरित ३६५ दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे २९ फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो.
पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे ३६५ दिवस लागतात. खगोलशास्त्रीय आकडेवारीनुसार नेमका कालावधी ३६५.३४२ दिवस इतका असतो. दरवर्षी ०.२४२ दिवसाचा वाढीव कालावधी शिल्लक राहतो. चार वर्षांमधील हा वाढीव कालावधी एकत्रित करुन त्याचा एक दिवस पूर्ण केला जातो. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असल्यामुळे त्याला जोडून ‘लीप दिवस’ साजरा केला जातो.
लीप वर्ष काही जणांसाठी खूप खास असतं. काही जण २९ फेब्रुवारीचा मुहूर्त साधून लग्न करतात.ज्यांचा जन्म लीप वर्षात २९ फेब्रुवारीला होतो, त्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी चार वर्ष वाट बघावी लागते.
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply