मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात “जळू” असू शकतो
जळू कसा दिसतो?
अळीसारखा पण रंग काळा. आकार असतो. Size – 5-6 सेंटीमीटर
जळू काय करतो?
नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि “Y” section चा cut देतो.
त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो
1) Anesthetic = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.
2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो.
नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास).
जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो.
ज्याला जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते.
जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे =
त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात.
जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी =
1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो.
2) तंबाखू चे पाणी
3) कापूर
4) Vinegar
5) साबणीचे पाणी
6)) लिम्बू पाणी
7) Few carbonated कोल्ड ड्रिंक
8)) Alcohol
9) आगीचा चटका
कारण यामुळे जाळूच्या त्वचेला दाह होतो.
जळू पडल्यानंतर काय करावे =
जळू पडल्यानंतर जखमेचे रक्त थांबत नाही (2तास ते 3 दिवस) कारण जळू ने anti-coaglulant ने रक्त पातळ केलेले असते.
हळद लाऊन फार फायदा होत नाही पण तरीही लावावी.
जखमेला मलम आणि कापूस लावून जखम घट्ट बांधावी.
जखम पुनः-पुनः उघडून बघू नये. जखमेला खाज आली तरी खाजवू नये.
पुढच्या दिवशी शरीरावर कुठेही लाल चटटे दिसले तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा.
या लेखाबद्दल वैद्य सुविनय दामले लिहितात…..
यात घाबरण्याचे कारण नाही.
भगवान धन्वन्तरीच्या हातातील हे एक प्रमुख शस्त्र आहे.
शंख चक्र अमृतकलश आणि जलौका.
यात बारा प्रकार असतात. यातील विषारी असतात. सहा बिनविषारी असतात.
वैद्य ओळखू शकतात. विषारी म्हणजे जहाल नाही. चावल्यावर फक्त खाज जास्ती येते इतकंच !
कोणाला मिळत असतील तर जवळपासच्या वैद्यांना नेऊन द्याव्यात
पंचकर्मातील रक्तमोक्षण नावाच्या विधीमधे या वैद्यांकडून वापरल्या जातात.
Where will get jalu